
भारतीय संघाच्या (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) दौऱ्यासाठी संघाची घोषणा येत्या काही दिवसात केली जाणार आहे. टीम इंडिया 3 ऑगस्ट पासून विंडीजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यादरम्यान, भारतीय संघ 3 टी-20, 3 वनडे आणि 2 टेस्ट मालिका खेळणार आहे. आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकाच्या सेमीफायनलमधील पराभवानंतर हा भारतीय संघाचा पहिला दौरा असणार आहे. सेमीफायनलमध्ये संघाच्या निराशाजनक खेळीनंतर संघाचे कर्णधार पद विराट कोहली (Virat Kohli) कडून काढून रोहित शर्मा (Rohit Sharma) ला देण्यात यावे अशी मागणी चाहते आणि जाणकार करत आहे. या दौऱ्यासाठी अनेक सिनियर खेळाडूंना विश्रांती देण्यात येणार होती. त्यात कर्णधार विराट देखील होता. मात्र, काही तासांपूर्वी विराट विंडीज दौऱ्यासाठी तयार असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, कोहली या आगामी विंडीज दौऱ्यासाठी अथक परिश्रम करतोय. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौर्यासाठी रोहित शर्मा नाही तर विराट कोहली करणार नेतृत्व, लवकरच होणार घोषणा)
रोहितला वनडे आणि टी-20 संघाचे कर्णधार पद देण्याची चर्चा सुरु होती. म्हणून कोहलीने आगामी दौर्यासाठी आपली उपस्थिती सांगितली असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या सामन्याआधी कोहली जिममध्ये खूप मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. विराटने आपल्या सोशल मीडियावर त्याच्या व्यायाम करतानाच व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना कोहलीने लिहिले, "कठोर परिश्रमाला पर्याय नाही." कोहलीने शेअर केलेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनी त्याचे कौतुक केले आहे.


दुसरीकडे, विंडीज दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा येत्या रविवारी केली जाणार आहे. या साठी भारताच्या युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये सलामीवीर पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर, मयांक अग्रवाल, रिषभ पंत यासारख्या खेळाडूंचा समावेश आहे. विश्वचषकमधील भारताच्या पराभवानंतर भारतीय संघात दोन गट पडल्याचे बोलले जात होते. एक गट विराटचा तर दुसरा रोहितचा आहे.