विराट कोहली (Image Credit: AP/PTI Photo)

भारतीय संघ (Indian Team) वेस्ट इंडिज (West Indies) दौर्यासाठी सज्ज होत आहे. विश्वचषकच्या सेमीफायनल सामन्यात निराशाजनक खेळीनंतर टीम इंडिया तो पराभव विसरत विंडीज संघाशी दोन हाथ करायला तयार आहे. भारताचा वेस्ट इंडिज दौरा 3 ऑगस्ट पासून सुरु होईल. भारत आणि विंडीज संघात तीन टी-20, तीन वनडे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. विश्वकपमधील पराभवानंतर संघात दोन गट पडल्याची चर्चा होत होती. त्यात एक गट कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) चा तर दुसरा उपकर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याचा असल्याचे बोलले जात होते. शिवाय बीसीसीआय (BCCI)देखील संघात स्प्लिट कॅप्टीन्सी चा पर्याय वापरणार असल्याचे समाजनात होते. त्याप्रमाणे रोहितकडे वनडे आणि टी-20 चे कर्णधार पद तर विराटकडे टेस्ट संघाचे कर्णधार पद देण्याचे बोलले जात होते. (IND vs WI: वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाची निवड लांबणीवर, या कारणांमुळे होतोय विलंब)

दरम्यान, टाइम्स ऑफ इंडिया चा एका रिपोर्ट्स नुसार विराट कोहलीच विंडीज दौर्यावर संघाचे तिन्ही मालिकांमध्ये भारताचे नेतृत्व करणार असल्याचे समजले आहे. "रविवार हा सर्व कल्पनांना विश्रांती घेण्याचा दिवस असेल, ज्यांना माहिती आहे त्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला सांगितले.

यापूर्वी भारताने 2016 मध्ये स्प्लिट कॅप्टीन्सीचा पर्याय वापरण्यात आला होता. तेव्हा माजिकर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाल्याने विराटला कर्णधारपद देण्यात आले होते तर धोनी हा केवळ वनडे आणि टी-20 संघाचा कर्णधार होता. नोव्हेंबर 2007- ऑक्टोबर 2008 पर्यंत अनिल कुंबळे (Anil Kumble) याने टेस्ट संघाचे कर्णधारपद भूषविले होते तर धोनीकडे वनडे आणि टी-20 संघाची जबाबदारी देण्यात आली होती. पण हे ही लक्षात घेणे आवश्यक आहे की स्प्लिट कॅप्टीन्सीचा सिद्धांत भारत आजवर कधीही यशस्वी झालेला नाही.