भारतात क्रिकेटचा उत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14व्या हंगामाला (IPL 14) येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होणार आहे. जवळपास दोन महिने चालणाऱ्या या स्पर्धेत पुन्हा एकदा आठ संघ आयपीएला खिताब जिंकण्यासाठी एकमेकांशी भिडणार आहेत. दरम्यान, गेल्या हंगामात प्लेऑफमध्ये स्थान मिळविण्यात अपयशी ठरलेली चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) संघ यावेळी चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. महेंद्रसिंह धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चेन्नईने 3 वेळा आयपीएलचा खिताब जिंकला आहे. या हंगामात चांगली कामगिरी करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात जोरदार सराव करताना दिसत आहे.
नुकताच सीएसकेने त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या गेल्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणारा महेंद्र सिंह धोनी कशाप्रकारे चेंडू मैदानाबाहेर पाठवत आहे? हे या व्हिडिओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हे देखील वाचा- IPl 2021: आरसीबीच्या संघाला मोठा धक्का! सलामीवर देवदत्त पडिक्कल याला कोरोनाचा संसर्ग; 'या' 3 खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याची शक्यता
इंस्टाग्राम पोस्ट-
View this post on Instagram
चेन्नई सुपर किंग्जचा संघ-
महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), फाफ डू प्लेसी, ऋतुराज गायकवाड, सुरेश रैना, अंबाती रायुडू, एन जगदीशन, रॉबिन उथप्पा, रवींद्र जाडेजा, सॅम करन, ड्वेन ब्राव्हो, कर्ण शर्मा, आर साई किशोर, मिचेल सॅटनर, इमरान ताहीर, दिपक चहर , शार्दुल ठाकुर, लुंगी एन्गेडी, जोश हेजलवुड, केएम आसिफ, मोईन अली, कृष्णाप्पा गौतम, चेतेश्वर पुजारा, हरिशंकर रेड्डी, भगत वर्मा, हरी निशांत.