रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

भारतात सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या चौदाव्या हंगामाला (IPL 14) येत्या 9 एप्रिलपासून सुरुवात होत आहे. या हंगामातील पहिला सामना मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Banglore) यांच्यात खेळला जाणार आहे. मात्र, याआधीच आरसीबीच्या संघाला मोठा झटका बसला आहे. सलामीवीर देवदत्त पडिक्कल (Devdutt Padikkal) कोरोनाच्या (Coronavirus) जाळ्यात अडकला आहे. यामुळे त्याच्या ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पडिक्कलने आयपीएलच्या मागील हंगामात चांगली कामगिरी बजावली होती. त्याने 15 सामन्यात 473 धावा केल्या होत्या. यात 5 अर्धशतकांचा समावेश आहे. परंतु, आयपीएलचा चौदावा हंगाम सुरु होण्याआधीच पडिक्कलला कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे त्याला सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकावे लागणार आहे. यामुळे पडिक्कल ऐवजी कोणत्या खेळाडूला संघात जागा मिळणार? असा प्रश्न आरसीबीच्या चाहत्यांना पडला आहे. तसेच त्याच्या जागेवर आरसीबी खालील 3 खेळाडूंपैकी एकाला संधी देण्याची शक्यता आहे. हे देखील वाचा- महाराष्ट्र: IPL 2021 पाहण्यासाठी क्रिकेट प्रेमींना स्टेडियममध्ये परवानगी नाही- नवाब मलिक

मोहम्मद अजहरुद्दीन-

मोहम्मद अजहरूद्दीन हा भारतीय खेळाडू आहे. त्याने सैय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये चागंले प्रदर्शन केले होते. केरळच्या संघाकडून खेळत असताना 5 सामन्यात 214 धावा केल्या होत्या. यामुळे याला पडिक्कडच्या जागेवर संधी मिळण्याची शक्यता आहे.

फिन एलन-

फिन एलन हा न्यूझिलंडच्या संघाचा सलामीवीर फलंदाज आहे. एलन त्याच्या कामगिरीमुळे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. नुकतीच त्याने बांग्लादेश विरुद्ध आक्रमक फलंदाजी केली होती. यावेळी त्याने 29 चेंडून 71 धावांची खेळी केली होती. यामुळे आरसीबीच्या संघाची नजर एलनवर पडू शकते.

रजत पटीदार-

घरच्या मालिकेत मध्यप्रदेशच्या फलंदाजाने सर्वांनाच अचंबित केले आहे. सय्यद मुश्ताक ट्रॉफीमध्ये रजतने 5 सामन्यात 2 अर्धशतके आणि एका सामन्यात 90 धावांची खेळी केली होती. ज्यामुळे आरसीबी संघात स्थान निश्चित करण्यात त्याला यश आले आहे. या 27 वर्षीय फलंदाजालाही आयसीबी संधी देऊ शकते.

आयपीएलचा चौदाव्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच आरसीबीच्या अडचणी वाढल्या आहे. विराट कोहली आणि टीम मॅनेजमेंटला त्यांना कोण संधी देईल? हे ठरवायचे आहे. याशिवाय, पडिक्कल लवकरच संघात सामील होऊन गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही आपल्या बॅटने धावांचा डोंगर उभा करेल, अशी आशा आरबीच्या संघाकडून व्यक्त केली जात आहे.