टीम इंडिया कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) यांना 11 जानेवारी रोजी कन्यारत्नची प्राप्ती झाली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी कसोटी सामना अनिर्णीत करत चाहत्यांना दिलासा दिला तर विराटने काही तासांनंतर आपल्या घरी चिमुकल्या पाहुणीचं आगमन झाल्याचं जाहीर करत गुड न्यूज शेअर केली. मग काय बॉलीवूड आणि काय क्रिकेट विश्व, चहुबाजूने 'विरुष्का' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जोडप्यावर शुभेच्छांना वर्षाव सुरु झाला. ‘कळवण्यास खूप आनंद होत आहे की आम्हाला कन्यारत्न प्राप्ती झाली’, अशा आशयाचा संदेश त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केला. विराटने चाहत्यांचे त्यांच्या प्रेम आणि आशीर्वादासाठी आभार मानले. बॉलीवूडचे महानायक बिग बी अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या, पण जरा हटके अंदाजात. (विराट कोहली, अनुष्का शर्मा च्या घरी चिमुकल्या परीचं आगमन)
अमिताभ यांनी एक फोटो पोस्ट केला ज्यात संघातील विविध खेळाडूंची विशेष म्हणजे अशा क्रिकेटपटूंची नावं आहेत ज्यांना यापूर्वी कन्यारत्नची प्राप्ती झाली आहे. सुरेश रैना, गौतम गंभीर आणि रोहित शर्मा यांच्यापासून यादीची सुरुवात झाली आणि अखेर विराटचं नाव जोडण्यात आलं आहे. इतकंच नाही तर बिग म्हणाले की भारताच्या भविष्यातील महिला क्रिकेट संघ तयार होत आहे. अमिताभ यांनी फोटोसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं की ... आणि धोनीला मुलगीही आहे ..ती या संघाची कर्णधार असेल का? असा सवाल त्यांनी केला.
T 3782 - An input from Ef laksh ~
"... and Dhoni also has daughter .. will she be Captain ? 🙏'' pic.twitter.com/KubpvdOzjt
— Amitabh Bachchan (@SrBachchan) January 13, 2021
मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अनुष्काने पहिल्या बाळास जन्म दिला. आधुनिक युगातील एक महान फलंदाज म्हणून ओळखल्या जाणार्या कोहली आणि प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का 11 डिसेंबर, 2017 रोजी एका खाजगी समारंभात लग्नबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काने अद्याप त्यांच्या मुलीचं नाव जाहीर केलं नसलं त्यांनी माध्यमांना त्यांच्या कुटुंबाच्या एकांताचा आदर करण्यास सांगितले आहे. माध्यमांना दिलेल्या चिठ्ठीत त्यांनी लिहिले की, "इतकी वर्षे आपण आम्हाला दिलेल्या सर्व प्रेमाबद्दल धन्यवाद. हा आनंददायक प्रसंग आपल्याबरोबर साजरा करण्यात आम्हाला आनंद झाला. पालक म्हणून आमच्याकडे आपणास विनम्र विनंती आहे. आम्ही आमच्या मुलाच्या एकांताचे रक्षण करू इच्छित आहोत आणि आम्हाला आपल्या मदतीची आणि समर्थनाची आवश्यकता आहे."