Virender Sehwag's IPL 2020 XI: वीरेंद्र सेहवागच्या सर्वोत्तम IPL इलेव्हनमध्ये सूर्यकुमार यादवचा समावेश; विराट कोहली कर्णधार तर ट्रेंट बोल्टला डच्चू
विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव (Photo Credit: PTI)

Virender Sehwag's IPL 2020 XI: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 संपुष्टात आल्यानंतर टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) या स्पर्धेतून सर्वोत्कृष्ट इलेव्हनची निवड केली आहे. सेहवागने निवडलेल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये (Virender Sehwag IPL XI) काही आश्चर्यकारक समावेश व खेळाडू वगळले गेले आहेत. फलंदाजीने यंदा आयपीएलमध्ये समाधानकारक कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीला (Virat Kohli) सेहवागने आपल्या आयपीएल इलेव्हनमध्ये ठेवले आणि कर्णधार म्हणून त्याची निवड केली. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला (Trent Boult) देखील सेहवागने वगळले आहेत. सेहवागने Cricbuzz लाईव्ह शो दरम्यान आयपीएल (IPL) 2020 ची आपली सर्वोत्तम इलेव्हन निवडली. या संघाच्या सलामीच्या जोडीसाठी सेहवागने स्पर्धेतील सर्वाधिक धावा करणारा केएल राहुल आणि 'टूर्नामेंटचा उदयोन्मुख खेळाडू' म्हणून निवडण्यात आलेल्या देवदत्त पडिक्क्लचा समावेश केला आहे. देवदत्तने या स्पर्धेच्या 15 सामन्यात 473 धावा केल्या ज्यात 5 अर्धशतकांचाही समावेश आहे.

या संघात तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी सेहवागने मुंबई इंडियन्सकडून चमकदार कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवची निवड केली. त्याशिवाय चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी त्याने संघाचा कर्णधार कोहलीची निवड केली. 'मुलतानचा सुलतान' म्हणून ओळखल्या जाणार्‍या सेहवागने सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेविड वॉर्नरचा पाचव्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून केला. याशिवाय सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी सेहवागने एबी डिव्हिलियर्सची निवड केली. वेगवान गोलंदाजीत सेहवागने कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमीच्या तिगडीचा समावेश केला. फिरकी विभागाची लगाम त्याने युजवेंद्र चहल आणि राशिद खान यांच्याकडे दिली.

या संघाबद्दलची मजेदार गोष्ट अशी की सेहवागने 12व्या तसेच 13 व्या खेळाडूची निवड केली आहे. 12व्या क्रमांकासाठी त्याने स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या ईशान किशनची निवड केली, तर 13व्या खेळाडूच्या रूपात त्याने या मोसमातील या स्पर्धेचा 'सर्वाधिक मूल्यवान खेळाडू' जोफ्रा आर्चरचा समावेश केला आहे.

वीरेंद्र सेहवागचा सर्वोत्कृष्ट आयपीएल प्लेइंग इलेव्हन: केएल राहुल, देवदत्त पडिक्क्ल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली (कॅप्टन), डेविड वॉर्नर, एबी डिव्हिलियर्स, कगिसो रबाडा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल आणि राशिद खान.

12वा खेळाडू - ईशान किशन.

13वा खेळाडू-जोफ्रा आर्चर.