महाराष्ट्र पोलीस लोगो, विराट कोहली आणि झहीर खान (Photo Credit: Twitter/Getty)

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी वेगवान गोलंदाज झहीर खान (Zaheer Khan) यांनी पोलिस दलाचे आभार मानत म्हणून ट्विटरवर आपल्या डीपीवर महाराष्ट्र पोलिसांचा (Maharashtra Police) लोगो लावला. कोरोना व्हायरसविरूद्ध (Coronavirus) लढ्यात सर्वसामान्यांना मदत केल्याबद्दल विराटने महाराष्ट्र पोलिसांचे कौतुक केले आहे. कोहलीने आपल्या ट्विटर अकाउंट प्रोफाइल फोटोवर महाराष्ट्र पोलिसांच्या लोगोचा फोटो लावला आणि चाहत्यांनीही याचे अनुसरण करण्याचा आवाहन केले. कोहलीने लिहिले, “महाराष्ट्र पोलिस त्रास, हल्ले आणि आपत्ती दरम्यान नागरिकांसोबत उभे राहिले आहेत. आज, जेव्हा ते कोरोनाविरूद्ध रस्त्यावर युद्धाचे नेतृत्व करीत आहे, तेव्हा मी महाराष्ट्र पोलिसांचा लोगो माझ्या डीपीवर ठेवून महाराष्ट्र पोलिसांचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयत्नात मला सामील व्हा." विराटऐवजी माजी वेगवान गोलंदाज झहीर खान, मुंबई इंडियन्स टीमचा फलंदाज सूर्यकुमार यादव यांनीही आपल्या ट्विटरवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून त्यांचे आभार मानले आहे. (महाराष्ट्र पोलीस दलातील 786 कर्मचारी COVID-19 पॉझिटीव्ह; 88 अधिकाऱ्यांसह 698 पोलिसांचा समावेश)

महाराष्ट्र पोलिसांनी कोरोनाच्या या कठीण काळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहत कौतुकास्पद कामगिरी केली आहे आणि यासाठी सोशल मीडिया यूजर्सही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहे. 41 वर्षीय झहीरनेही आपला ट्विटर डीपी बदलला आणि त्याऐवजी महाराष्ट्र पोलिसांचा लोगोचा लावला. सचिन तेंडुलकर यानेही ट्विटरवर महाराष्ट्र पोलिसांचा लोगो लावून आणि भारतभरातील पोलिस दलांचे आभार मानले. "आमच्या सुरक्षिततेसाठी 24/7 अथक प्रयत्न करीत असलेले महाराष्ट्र पोलिस आणि भारतभरातील पोलिस दलांचे खूप आभार," सचिन म्हणाला.

पाहा खेळाडूंचे ट्विट

विराट कोहली

झहीर खान

सूर्यकुमार यादव

सचिन तेंडुलकर

विशेष म्हणजे या खेळाडूंशिवाय बॉलिवूड अभिनेते सलमान खान, अजय देवगण, रितेश देशमुख आणि अभिनेत्री कटरिना कैफ यांच्यासह राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटच्या डीपीवर महाराष्ट्र सरकारचा लोगो लावला आहे. भारतात कोरोना बाधितांची सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात आहे. येथे या व्हायरसने बाधित लोकांची संख्या 20,000 च्या वर गेली आहे तर 700 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.