विराट कोहली (Photo Credit: Getty Images)

भारताचा कर्णधार विराट कोहलीविरोधात (Virat Kohli) दुहेरी हितसंबंधांचा आरोप मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे (MPCA) आजीवन सदस्य संजीव गुप्ता (Sanjeev Gupta) यांनी केला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) निती अधिकारी डीके जैन (DK Jain) यांनी ही माहिती दिली. गुप्ता यांनी बीसीसीआय लोकपाल न्यायमूर्ती जैन यांना पत्र लिहिले असून त्यांनी तक्रारीची तपासणी करण्याचे आश्वासन दिले. "बीसीसीआय नियम 39 (2) (बी) अंतर्गत श्री कोहली विरुद्ध बीसीसीआय नियम 38 (4) च्या विरोधात तक्रार" या शीर्षकाखाली लोकपालशी बोलताना गुप्ता म्हणाले की, कोहलीच्या ताब्यात दोन पदं आहेत. पाहिलं एक खेळाडू म्हणून आणि दुसरा करारनामा म्हणून." कोहली एकावेळी दोन पदांवर आहे जे भारतीय सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मंजूर केलेल्या बीसीसीआय नियम 38 (4) चे उल्लंघन केल्याचेआहे. बीसीसीआयच्या नियमांनुसार एक व्यक्ती एकापेक्षा अधिक पदे भूषवू शतक नाहीत याकडे गुप्ता यांनी लक्ष वेधले. दरम्यान, गुप्ता यांनी यापूर्वी राहुल द्रविड, सौरव गांगुली, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि कपिल देव या माजी खेळाडूंविरोधात दुहेरी हितसंबंधांचा आरोप केला होता. (हार्दिक पांड्याच्या ‘फ्लाईंग पुश-अप्स’वर विराट कोहली फिदा, क्लॅप 'ट्विस्ट'ने पूर्ण केला चॅलेंज)

कोहली, भारताच्या क्रिकेट संघाचा कर्णधार आहे आणि सोबत एका कंपनीचा सह-संचालकदेखील आहे जी संघातील बर्‍याच खेळाडूंचे व्यवस्थापन सांभाळते. "मला तक्रार मिळाली आहे. मी त्याची तपासणी करेन आणि मग एखादी केस बनते की नाही ते पाहूया. जर केस बनली तर मी कोहलीला उत्तर देण्याची संधी देईन," जैन यांनी पीटीआयला सांगितले. कॉर्नरस्टोन वेंचर्स पार्टनर्स एलएलपीमध्ये कोहली हा संचालक आहे आणि विराट कोहली स्पोर्ट्स एलएलपी या कंपनीत सहसंचालकांमध्ये आहे, असा दावा गुप्ता यांनी केला. अमित अरुण सजदेह (बंटी सजदेह) आणि विनय भारत खिमजी हेदेखील या कंपनीत सह-संचालक आहेत. भारतीय कर्णधार व्यतिरिक्त ही कंपनी केएल राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि कुलदीप यादवसह इतर अनेक खेळाडूंच्या व्यावसायिक हितसंबंधांचे व्यवस्थापन करते.

मागील महिन्यात जैन यांच्या कार्यकाळात एका वर्षाची मुदत वाढविल्यानंतरची ही पहिली मोठी घटना आहे. याआधी द्रविड, गांगुली, लक्ष्मण आणि कपिलदेव या माजी खेळाडूंनाही दुहेरी हितसंबंधांच्या आरोपांना सामोरे जावे लागले होते. या सर्व दिग्गज खेळाडूंना पदाचा राजीनामा द्यावा लागला. या तक्रारी नंतर फेटाळून लावल्या. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीच लोढा समितीने निश्चित केलेल्या हितसंबंधांचे निकष वास्तववादी नसल्याचे म्हटले आहे.