जेव्हा फलंदाजी आणि फिटनेसचा विचार केला तर अशा कोणतीही गोष्टी नाही जी विराट कोहली (Virat Kohli) करू शकत नाही. विराट आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूप कडक शिस्तीचा आहे. तो बऱ्याचदा आपले जिममधील वर्कआऊटचे व्हिडीओ पोस्ट करत असतो. आणि जर एखादा व्यक्ती फिटनेसमध्ये नाविन्य घेऊन येत असताना त्याला दिसले तर तो त्यात केवळ निपुणच होण्याची काळजी घेत नाही तर त्याला ट्विस्ट जोडून पुढे एक पाऊल पुढे टाकण्याचाही प्रयत्न करतो. आणि नुकतच अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) ‘फ्लाइंग’ पुश-अपमुळे प्रभावित होऊन भारतीय कर्णधाराने आव्हान स्वीकारले आणि त्यात आणखी एक मोलाची भर टाकली. हार्दिकने एक असा व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात तो उड्या मारत पुश-अप्स करताना दिसला. साहजिकच या अनोख्या पुश-अप्सवर विराट फिदा झाला आणि त्याने ‘फ्लाईंग पुश-अप्स’मध्ये (Flying Push-Ups) थोडा ट्विस्ट करत नवा प्रकार शोधला. ('लेकिन दिल साफ है'! विराट कोहलीने 'कॉफी' फोटोवरून केएल राहुलला ट्रोल करण्याचा केला प्रयत्न, बदल्यात मिळाले झकास उत्तर)
कोहलीने आपल्या राहत्या घरी पुशअप करत असलेला कसरत व्हिडिओ शेअर केला. पुश-अप्स मारताना उड्या तर त्याने मारल्याच पण त्यात 'क्लॅप' ट्विस्ट जोडला. त्याने हवेत उडी मारताना टाळ्या वाजवून दाखवल्या. कोहलीने पोस्टला कॅप्शन देत म्हटले, “हे हार्डिक पांड्या तुझ्या फ्लाय पुश अप्स खूप आवडल्या. इथे त्यास 'क्लॅप' ट्विस्ट जोडत आहे.”
पाहा व्हिडिओ:
View this post on Instagram
Hey H @hardikpandya93 loved your fly push ups 💪😎. Here's adding a little clap to it 😉.
पाहा हार्दिकचा पुश-अप्स व्हिडिओ:
विराटचे 'क्लॅप' पुश-अप्स पाहून हार्दिकही प्रभावित झाला आणि म्हणाला, "छान भावा, मला असे वाटते की हे चॅलेंज पूर्ण करणे आव्हानात्मक असेल."
मार्चपासून भारताने एकही आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळला नाही. त्यांची दक्षिण आफ्रिकाविरुद्धची अखेरची मालिका कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आली. आशिया चषक आणि टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अद्याप चित्र स्पष्ट नसल्याने डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा विराट सेनेचा पहिला आंतरराष्ट्रीय दौरा असणार आहे.