भारतीय संघाचा (Indian Team) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक महान फलंदाज आहे. कसोटी क्रिकेट ते एकदिवसीय आणि आता टी-20 त्याची ख्याती सर्वत्र पसरली आहे. क्रिकेटच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये त्याच्या बॅटने गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली आहे. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 23 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. याशिवाय विराटच्या नावावर 70 शतके आणि 55 पेक्षा अधिक सरासरीची नोंद आहे. 13 वर्षांच्या या प्रदीर्घ कारकिर्दीत विराटने आतापर्यंत अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. बॅटिंगच्या पीचवर त्याने महान सर डॉन ब्रॅडमन, सचिन तेंडुलकर यांना अनेकदा आव्हान दिले आहे. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एक टप्पा असा आहे ज्यासाठी विराट कोहली गेल्या 11 वर्षांपासून धडपडत आहे. आणि ते टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील पहिले शतक आहे. (T20 World Cup 2021: गोलंदाजी करण्यात असमर्थ असल्यास Hardik Pandya ची होऊ शकते टीम इंडियातून एक्सिट, ‘हे’ तीन खेळाडू जागा घेण्याचे आहेत प्रमुख दावेदार)
2010 मध्ये टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या विराटने आतापर्यंत एकूण 90 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 3159 धावा केल्या आहेत. जगातील कोणत्याही फलंदाजाने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत इतक्या धावा केलेल्या नाहीत. पण तथापि इतक्या धावा करूनही त्याने आतापर्यंत त्याला या फॉरमॅटमध्ये आपल्या पहिल्या शतकाची नक्कीच कमतरता जाणवत असेल. अशा परिस्थितीत, यंदा टी-20 विश्वचषक दरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये शतकाचा दुष्काळ संपुष्टात आणावा अशी चाहत्यांना नक्कीच अपेक्षित असेल. एकूणच टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचे झाले तर विराट कोहलीने या फॉर्मेटमध्ये आतापर्यंत एकूण 5 शतके केली आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहली तीन वेळा शतक पूर्ण करण्यापासून चुकला आहे. विशेष म्हणजे तीन वेळा शतकी धावसंख्येचा जवळ पोहोचल्यावर तो नाबाद परतला आहे.
जानेवारी 2016 मध्ये अॅडलेड मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध तो 90 धावांवर नाबाद राहिला. त्याच वर्षी, टी-20 विश्वचषकमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने नाबाद 89 धावा केल्या. यानंतर, डिसेंबर 2019 मध्ये त्याला पुन्हा एकदा वेस्ट इंडिजविरुद्ध शतक झळकावण्याची संधी मिळाली. पण त्याला 94 धावांवर समाधान मानावे लागले. दुसरीकडे, विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून शतक केले नसेल तरी सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत एकूण 28 वेळा 50 चा आकडा पार केला आहे. या यादीत रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर एकूण 22 अर्धशतके आहेत.