जेतेपद पटकावण्याचा प्रबळ दावेदार म्हणून विराट कोहलीची भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) टी-20 विश्वचषक (T20 World Cup) 2021 स्पर्धेत मैदानात उतरेल. मात्र, बीसीसीआय (BCCI) संघातील काही भारतीय खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत थोडीशी चिंतेत असल्याचं दिसत आहे. आणि यामध्ये संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याचे (Hardik Pandya) नाव आघाडीवर आहे. भारताकडे टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी अंतिम 15 सदस्यीय संघ पाठवण्यासाठी काही दिवसांचा कालावधी आहेत आणि अहवालांमध्ये सूचित केल्यानुसार हार्दिकची संघातून एक्सिट होऊ शकते. हार्दिकची संघात वेगवान अष्टपैलू म्हणून निवड झाली. तथापि, 28 वर्षीय अष्टपैलूने काही काळ गोलंदाजी केली नाही. तसेच यूएईमध्ये आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यात त्याने मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) एकही षटक टाकला नाही. याशिवाय, तो बॅटने देखील प्रभाव पाडू शकला नाही आणि बर्याचदा कमी धावसंख्येवर आऊट झाला. त्याचा खराब फॉर्म आणि दुखापतीची चिंता पाहता त्याची बदली होण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय संघात हार्दिकची जागा घेण्यासाठी मुख्य दावेदार असलेल्या खेळाडूंवर नजर टाकूया. (IPL 2022 मध्ये आता ‘या’ खेळाडूला रिटेन करण्यापूर्वी Mumbai Indians दोनदा विचार करेल, लिलावात नाही मिळणार जास्त भाव)
दीपक चाहर
हार्दिक पांड्याची बदली म्हणून संघात दीपक उत्तम निवड ठरू शकतो. त्याला पॉवर प्लेमध्ये लवकर हवेत बाउन्स मिळतो ज्यामुळे विरोधी फलंदाजांवर दबाव येतो. तसेच चाहरकडे सुरुवातीला विकेट घेण्याची क्षमता आहे आणि त्यामुळे तो हार्दिकच्या संघात बदलीसाठी गंभीर दावेदार बनू शकतो. बॅटने योगदान देण्याची त्याची क्षमता देखील अज्ञात नाही. श्रीलंकेविरुद्ध त्याने केलेली 69 धावांची खेळी ही त्याचे उत्तम उदाहरण आहे.
शार्दूल ठाकूर
हार्दिक गोलंदाजी करत नसेल तर त्याच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी दिली जाऊ शकते. ठाकूर आधीच भारतीय संघात स्टँडबाय म्हणून आहे आणि त्याला बहुधा संधी मिळण्याची शक्यता आहे. ठाकूर हा भारताच्या सध्याच्या सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच शार्दुल गेल्या दोन वर्षांत झेप घेतल्यामुळे सुधारला आहे हे नाकारता येत नाही. त्याने वेळोवेळी कठीण परिस्थितीत भारताला विकेट मिळवण्यास मदत केली. याशिवाय, डावाच्या शेवटच्या काही षटकांमध्ये बॅटने धावा करण्यासाठी देखील त्याच्यावर विश्वास ठेवला जाऊ शकतो. ठाकूरचा अलीकडील फॉर्म निवडकर्त्यांना यादीतील इतर सर्वांपेक्षा पुढे त्याला प्राधान्य देण्यास प्रवृत्त करू शकतो.
हर्षल पटेल
हर्षल पटेल सध्या ज्या प्रकारे गोलंदाजी करत आहे त्याला मोठ्या स्पर्धेसाठी भारताच्या संघात समाविष्ट करण्याचा चुकीचा निर्णय ठरणार नाही. त्याने RCB साठी बॉलने एकट्याने सामने जिंकले आहेत. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये हॅटट्रिकसह जबरदस्त काम केले आहे. 14 सामन्यांमध्ये त्याने सुमारे 10 च्या स्ट्राईक रेटने 30 विकेट्स घेतल्या आहेत. पटेलचे स्लो बॉल त्याचे सर्वात मोठे शस्त्र असल्याचे सिद्ध झाले आहे आणि आयसीसी टी-20 विश्वचषकमध्ये यूएईच्या स्लो ट्रॅकवरील मोठ्या संघांविरुद्ध ते उपयोगी पडू शकतात. हर्षल आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी एकही सामना खेळला नाही, परंतु सध्या चालू असलेल्या आयपीएल 2021 मध्ये त्याचा सध्याचा फॉर्म पाहता, बीसीसीआयने त्याला 15 सदस्यीय संघात समाविष्ट केल्यास आश्चर्य वाटू नये.