Virat Kohli (Photo Credit- X)

Virat Kohli's Statement on Bangalore Stampede: इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु (RCB) संघाने पंजाब किंग्जला हरवून 18 वर्षांनंतर पहिल्यांदा विजेतेपद पटकावले. या विजयानंतर जिथे आरसीबीचे खेळाडू खूप आनंदी होते, तिथेच बंगळूरुमध्ये चाहत्यांचा उत्साहही ओसंडून वाहत होता. आरसीबी फ्रँचायझीने 4 जून रोजी बंगळूरुमध्ये 'विक्टरी परेड' चे आयोजन केले होते. मात्र, गर्दी वाढल्याने मोठी चेंगराचेंगरी झाली, ज्यामुळे आनंदाचे वातावरण दुःखात बदलले. या दु-र्घटनेत 11 लोकांचा जीव गेला, तर अनेक जण जखमी झाले. आता या संपूर्ण प्रकरणावर आरसीबीचा स्टार खेळाडू विराट कोहलीने (Viart Kohli) आपले मौन तोडले आहे.

'तुम्ही अशा दिवसासाठी कधीच तयार नसता'

बंगळूरुतील चेंगराचेंगरीला तीन महिने उलटल्यानंतर विराट कोहलीने एक वक्तव्य केले आहे. आरसीबी फ्रँचायझीने हे वक्तव्य त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केले आहे. कोहली म्हणाला की, "आयुष्यात कोणतीही गोष्ट तुम्हाला 4 जूनसारख्या दुःखद दिवसासाठी तयार करत नाही. आमच्या फ्रँचायझीच्या इतिहासातील सर्वात आनंदाचा क्षण एका दु-ःखद घटनेत बदलला. ज्या लोकांना आम्ही गमावले, त्यांच्या कुटुंबाचा आणि जखमी चाहत्यांचा मी विचार करत आहे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करत आहे. तुमची ही हानी आता आमच्या कथेचा एक भाग आहे. आम्ही सर्वजण जबाबदारीने पुढे जाऊ."

हे देखील वाचा: Afghanistan Beat Pakistan: अशिया कपआधीच उघड झाली पाकिस्तानची 'नाचक्की', अफगाणिस्तानने दाखवून दिले 'पठाणी' दम

मृ-तांच्या कुटुंबीयांना 25 लाखांची मदत

रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु फ्रँचायझीने 'आरसीबी केअर्स' च्या माध्यमातून चेंगराचेंगरीमध्ये मृ-त्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना 25 लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. या घटनेत जवळपास 33 लोक जखमी झाले होते. या प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले होते, त्यानंतर बंगळूरुच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये कोणताही आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेलेला नाही. तसेच, 2025 मध्ये होणाऱ्या महिला एकदिवसीय विश्वचषकातील सामने आता नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमीमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.