PC-X

Virat Kohli Throws Cap in Anger: आयपीएल 2025 च्या कालच्या सामन्यात काही रोमांचक घटना घडल्या. त्यातील एक म्हणजे सूर्य कुमार यादवचा (Suryakumar Yadav) कॅच सुटला. सूर्य कुमारचा कॅच पकडताना यष्टीरक्षक जितेश शर्मा आणि यश दयाल यांच्यात टक्कर झाली आणि कॅच सुटला. त्यानंतर विराट कोहली (Virat Kohli) संतापला आणि रागाच्या भरात त्याने त्याची कॅप जमिनीवर फेकली. डावाच्या 12 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर दयालने हळू चेंडू टाकला. ज्यामुळे सूर्यकुमारचा चेंडू हवेत गेला. मात्र, जितेश आणि दयाल यांच्यातील ताळमेळ चुकल्यामुळे विकेट वाया गेली.

कॅच सोडला तेव्हा सूर्यकुमार 27 धावांवर फलंदाजी करत होता. त्यानंर सूर्यकुमार 28 धावांवर बाद झाला. याआधीही अनेकवेळा विराटच्या तीव्र प्रतिक्रीया मैदानावर पहायला मिळाल्या आहेत. परंतु अलिकडच्या काळात त्याच्या प्रतिक्रिया त्या तुलनेत खूपच कमी झाल्या आहेत.