Virat Kohli (Photo Credit X)

Virat Kohli To Retire After IPL 2025?: सोशल मीडियावर दररोज काही ना काही व्हिडिओ किंवा फोटो व्हायरल होतो. यापैकी अनेकांचा सत्याशी काहीही संबंध नाही. किंवा असं म्हणा, पोस्ट आणि व्हिडिओ खोटे किंवा दिशाभूल करणारे दावे करून व्हायरल केले जातात. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने (Virat Kohli) या आयपीएल (IPL 2025) हंगामाला त्याचा शेवटचा हंगाम म्हणून अधिकृतपणे घोषित केले आहे आणि त्यानंतर तो निवृत्त होण्याचा विचार करत आहे. मात्र, दाव्याची सत्यता पडताळली असता वापरकर्ते खोटे दावे करत असल्याचे समोर आले.

व्हायरल होत असलेली पोस्ट

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकवर, एका वापरकर्त्याने 1 एप्रिल 2025 रोजी कोहलीचा फोटो शेअर केला आणि लिहिले, 'हृदयद्रावक, विराट कोहली आयपीएलनंतर निवृत्ती घेत आहे.' त्याच वेळी, दुसऱ्या एका वापरकर्त्यानेही फेसबुकवर व्हायरल पोस्ट त्याच दाव्यासह शेअर केली आहे.

सत्य उघड झाले

विराट कोहलीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अद्याप आयपीएलमधून त्याच्या निवृत्तीची कोणतीही पोस्ट किंवा विधान आढळले नाही. याव्यतिरिक्त, व्हायरल दाव्याला समर्थन देणारे कोणतेही विश्वसनीय मीडिया रिपोर्ट समोप आले नाही.