इंग्लंड क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर केविन पीटरसन (Kevin Pietersen) याने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याला (Virat Kohli) आपल्या संघात खास फलंदाजाचा समावेश करण्याचा सल्ला दिला आहे. पिटरसनने इन्स्टाग्रामवर सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये एक लहान मुलगाहातात बॅट धरून घरात क्रिकेटचा सराव करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये, ज्या पद्धतीने डिपर घालणारा हा मुलगा ज्या प्रकार बॉल मारत आहे ते पाहून पीटरसनही प्रभावित झाला आणि त्याने खुद्द कोहलीला टॅग केले. पिटरसनने कोहलीला टॅग केले आणि लिहिले की विराट, " तुम्ही तुमच्या संघात यावे, तुम्ही निवड कराल का?" विराटने पीटरसनला प्रत्युत्तर देत लिहिलं की, "हा मुलगा कुठला आहे, अविश्वसनीय आहे."
व्हिडिओमध्ये एक लहान मूल आहे जो घरात क्रिकेटचा सराव करताना दिसतो डायपर परिधान करून फ्रंट फुटवर शॉट खेळत आहे. या लहान मुलाला पाहून एखादा अनुभवी क्रिकेटपटू खेळत असल्यासारखे दिसते आहे. दरम्यान, फक्त कोहलीच नव्हे तर यावर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डु प्लेसिस हादेखील प्रभावित झाला आणि त्यानेही प्रतिक्रिया देत लिहिले की, "असं नाही होऊ शकतं." इतकंच नाही तर अन्य यूजर्सदेखील या लहान मुलाच्या शॉटने प्रभावित झालेले दिसत आहे. अभिजीत नावाच्या एका यूजरने लिहिले की तो हार्दिक पंड्या याचा छोटा व्हर्जन आहे. या लहान मुलाने लगावले शॉट पाहून तुम्हीही या दिग्गज खेळाडूंच्या प्रतिक्रियांनी सहमत व्हाल.
View this post on Instagram
WHAT?!?!?!?!?! Get him in your squad, @virat.kohli! Can you pick him?!?! 😱
विराट आणि फाफची प्रतिक्रिया
दरम्यान, विराट सध्या वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या वनडे मालिकेत व्यस्त आहे. भारताने यापूर्वी टी-20 मालिकेत वेस्ट इंडिजचा 2-1 ने जिंकली होती. यानंतर टीम इंडियाचे लक्ष्य वनडे मालिका जिंकण्यावर असेल. दुसरीकडे, विंडीज संघ मालिकेची सुरुवात विजयाने करू इच्छित असेल.