आयपीएल (IPL) गव्हर्निंग कौन्सिलने सोमवारी काही महत्तवपूर्ण निर्णय घेतले. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आयपीएलमध्ये कन्कशन सबस्टीट्यूटचा नियम लागू करणार असल्याचे म्हटले. बीसीसीआय (BCCI) आयपीएल 2020 आधी ऑल स्टार मॅचचे आयोजन केले जाईल. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच असं होणार असून यामध्ये भारताचे तीन दिग्गज क्रिकेटपटू एकाच टीमकडून खेळू शकतात. हा सामना स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आयोजित केला जाईल. आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. ऑल-स्टार सामन्यासाठी चार फ्रँचायझी संघ एकत्र येऊ येतील. ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालानुसार उत्तर-पूर्व आणि दक्षिण-पश्चिम संघांचे असे संघ या ऑल-स्टार सामन्यात असू शकतात. आयपीएलमध्ये एकूण 8 फ्रँचायझी आहेत. (IPL 2020: यावर्षीपासून आयपीएलमध्ये लागू होणार 3 नवीन महत्त्वपूर्ण नियम, सौरव गांगुली ने केल्या अनेक मोठ्या घोषणा, जाणून घ्या)
बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल हे दोन संघ तयार करणार आहेत. यातील एका संघात दिल्ली कॅपिटल, किंग्ज इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्सच्या संघांचा समावेश असेल, तर दुसर्या संघात चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबादचे खेळाडू असतील. अश्या परिस्थितीत दक्षिण आणि पश्चिम संघांत विराट कोहली, एमएस धोनी, रोहित शर्मा, एबी डिव्हिलियर्स, जसप्रीत बुमराह, शेन वॉटसन, हरभजन सिंह आणि लसिथ मलिंगा सारखे खेळाडू सहभागी होतील, तर उत्तर आणि पूर्वेच्या फ्रँचायझीनुसार आंद्रे रसेल, रिषभ पंत, बेन स्टोक्स, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, पॅट कमिन्स, इयोन मॉर्गन आणि जोफ्रा आर्चर असे खेळाडू दुसर्या संघात असतील. अशा परिस्थितीत एक रोमांचक आणि उत्कृष्ट सामना प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतो.
आयपीएल 2020 ची सुरुवात 29 मार्चपासून होत आहे. ऑल-स्टार्स सामना कोणत्या मैदानावर खेळला जाईल याची अद्याप घोषणा झाली नाही. फेब्रुवारीच्या सुरूवातीस याची घोषणा होण्याची वर्तवली जात आहे.