बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी आता इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) च्या 2020 च्या हंगामासाठी नवीन नियम जाहीर केले आहेत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात कन्कशन सबस्टीट्यूटचा (Concussion Substitute) वापर केला जाण्याचे गांगुलीने सांगितले. काही महिन्यांनंतर सुरू होणाऱ्या आयपीएलच्या 13 व्या आवृत्तीमध्ये बीसीसीआय हा नियम वापरणार असले, तरीही हा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही काळापूर्वीच लागू करण्यात आला आहे. आयसीसीच्या नव्या नियमानुसार फलंदाजी किंवा गोलंदाजी दरम्यान एखाद्या खेळाडूला दुखापत झाल्यास सामना सोडून जाऊ शकतो आणि त्याऐवजी दुसरा खेळाडू सामन्यात येऊ शकतो, याला 'कन्कशन नियम' म्हणतात. अॅशेस मालिकेदरम्यानन स्टिव्ह स्मिथला दुखापत झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा मार्नस लाबूशेन कन्कशन नियमाद्वारे मैदानात फलंदाजीसाठी आला होता. आयपीएलपूर्वी (IPL) बीसीसीआय, जगातील अव्वल खेळाडूंना एकत्र करून ऑल स्टार्स सामन्याचे आयोजन करेल. हा एक सामना चॅरिटी सामना असेल. (IPL 2020 Final मुंबई मध्ये 24 मे दिवशी रंगणार; डे-नाईट सामन्यांंच्या वेळेत बदल नाही: सौरव गांगुली)
आयपीएलचा 13 वा हंगाम 29 मार्चपासून सुरू होईल आणि अंतिम सामना 24 मे रोजी मुंबईमध्ये खेळला जाईल. कन्कशनशिवाय गांगुली म्हणाले की, या हंगामात पाच डबल हेडर असतील म्हणजेच एका दिवसात दोन सामने खेळले जाईल. यामधील पहिला सामना चार वाजता आणि दुसरा सामना रात्री आठ वाजता खेळला जाईल. आणि याबाबत बीसीसीआयचे सचिव जय शहा लवकरच घोषणा करणार असल्याचे गांगुलीने म्हटले. सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून हे सामने सुरू करण्यासाठी खूप दबाव होता, परंतु गव्हर्निंग कौन्सिलने हा बदल न करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 'थर्ड अंपायर नोबल'देखील सादर करण्यात येणार आहे. या नियमांतर्गत आता थर्ड अंबारी मैदानावरील अंपायरच्या जागी नो बॉलचा निर्णय घेईल. हा प्रयोग भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानच्या मालिकेत करण्यात आला होता.