IPL 2020 Final मुंबई मध्ये  24 मे दिवशी रंगणार; डे-नाईट सामन्यांंच्या वेळेत बदल नाही: सौरव गांगुली
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: Twitter/IPL)

IPL 2020 या क्रिकेट विश्वातील थरारक स्पर्धेचा अंतिम सामना यंदा मुंबईमध्येच होणार असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिली आहे. दरम्यान यंदा आयपीएलचे सामने 29 मार्चपासून सुरू होणार आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना 24 मे दिवशी मुंबईत होणार आहे. यावर्षी आयपीएलचा 13 वा हंगाम रंगणार आहे. आज या हंगामातील मॅचेसबद्दल गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान यापूर्वी अहमदाबाद येथील सरदार पटेल स्टेडियम (Sardar Patel Stadium)मध्ये आयपीएल 13 व्या हंगामाचा अंतिम सामना रंगणार असल्याचं वृत्त होतं मात्र आता मुंबईत IPL 2020 चा अंतिम सामना रंगेल असे सांगण्यात आले आहे. विराट कोहली, रोहित शर्मा आणि एमएस धोनी आहे आयपीएल 2020 चे सर्वात महागडे Salaried खेळाडू, रिषभ पंत ही टॉप-5 मध्ये सामिल

आयपीएलच्या यंदाच्या सीझनमध्ये डे-नाईट सामन्याची वेळ रात्री 8 ऐवजी 7.30 करण्याचा प्रस्ताव होता. पण तो प्रस्तावदेखील या बैठकीत फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळेत कोणताच बदल होणार नाही. सोबतच आयपीएल स्पर्धेत संध्याकाळच्या सत्रात (4-8 PM) यावेळेत फक्त पाच दिवस सामने होतील असेदेखील सौरव गांगुलीने स्पष्ट केले आहे.

ANI Tweet

इंडीयन प्रिेमियर लीग ही अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय लीग आहे. परदेशातूनही क्रिकेट चाहते आयपीएलचे सामने पाहण्यासाठी भारतात येतात. अशाच चाहत्यांच्या आनंदात आणखी भर पडण्याची शक्यता आहे. यंदा आयपीमध्ये काही नव्या संघांचा समावेश होऊ शकतो अशी चर्चा काही दिवसांपासून मीडियामध्ये होती. तरूणाईमध्ये आयपीएलच्या सामन्यांबद्दल विशेष क्रेझ असते.