टी२० विश्वचषक २०२२ (T20 World Cup 2022) भारत नक्कीचं जिंकणार अशी प्रत्येक भारतीयांना आशा होती. कारण विश्वचषका दरम्यान एक पराभव सोडला तर टीम इंडियाने (Team India) प्रत्येक सामान्यात आपल्या नावी विजयचं नोंदवला होता पण सिमेफायनलमध्ये (Semi Final) भारताचं नेमक गणित पलटलं आणि भारतीयांच्या पदरी निराशा आली. इंग्लंडने (England) भारतावर १० विकेट्सने विजय मिळवत पार भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) धुव्वा उडवला. सोबतचं फायनल्स मध्ये पोहचण्याचं स्वप्न भंगलं. आयसीसी टी 20 वल्डकपच्या ट्रॉफीला (T20 World Cup Trophy) या वर्षीही मुकावं लागलं. पण तरीही भारताच्या हाती आयसीसीची (ICC) ट्रॉफी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारताला आयसीसी ट्रॉफी देवू शकतो तो एकचं गडी म्हणजे किंग कोहली (Virat Kohli). गेल्या काही दिवसांपूर्वीच आयसीसीकडून प्लेअर ऑफ द मंथ म्हणून विराट कोहलीच्या नावाची घोषणा करण्यात आली. पण आता विराट आपल्या नावी आयसीसीची ट्रॉफी नोंदवण्याच्या तयारीत आहे.
भारत फायनलमधून (T20 World Cup Final) बाहेर पडला असला तरी आयसीसीकडून (ICC) एक यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये विश्वचषकात (T20 World Cup Final) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावे आहेत. या यादीत विविध देशातील 9 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. पण 9 पैकी भारताच्या दोन स्टार खेळाडूंची नावं या यादीत आहेत. ते म्हणजे सूर्यकुमार यादव (Suryakumar) आणि विराट कोहली (Virat Kohli). (हे ही वाचा:- Team India Upcoming Schedule 2022: टी-20 विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर भारतीय संघ आता या दोन देशांचा करणार दौरा, जाणून घ्या संपुर्ण वेळापत्रक)
ICC Player Of The Tournament या पुरस्कारासाठी आता कोहलीची निवड केली जाऊ शकते अशी क्रिकेट विश्वात चर्चा आहे. ICC Player Of The Tournament असलेल्या खेळाडूला आयसीसी ट्रॉफी दिल्या जाते. त्यामुळे जर कोहलीची या पुरस्कारासाठी वर्णी लागल्या आयसीसीच्या ट्रॉफीवर भारत आपलं नावं कोरु शकतो . त्यामुळे भारताला जरी रिकाम्या हाताने टी २० विश्वचषकातून बाहेर पडावे लागले असले तरी किंग कोहलीला मात्र आता आयसीसीचा मानाचा Player Of The Tournament पुरस्कार मिळू शकतो