Virat Kohli च्या 'त्या' ट्विटला 'गोल्डन ट्विट ऑफ द इयर' चा मान
विराट कोहली-अनुष्का शर्मा (Photo Credits: Anushka/Instagram)

अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli)  या जोडीचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावरही त्यांचे जबरदस्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडिया भलतीच अॅक्टीव्ह असणारी ही जोडी कायम चर्चेत असते. विरुष्काच्या (Virushka) जोडीविषयी असलेल्या क्रेझमुळे विराटने अजून एक खास विक्रम केला आहे. करवाचौथला विराटने केलेल्या ट्विटला 'गोल्डन ट्विट ऑफ द इयर' (Golden Tweet of the Year) चा मान मिळाला आहे. चाहत्यांच्या प्रचंड प्रेमामुळे हे शक्य झालं आहे.

गेल्यावर्षी 11 डिसेंबरला विरुष्का इटलीत विवाहबद्ध झाले. हे सिक्रेट वेडींग देखील चांगलेच चर्चेत होते. यंदा विरुष्काचे पहिले करवाचौथ होते. त्यावेळेस विराटने अनुष्कासोबतचा फोटो ट्विटरवर शेअर करत माझे 'जीवन, माझे जग' असे फोटोला कॅप्शन दिले होते. सोशल मीडियावर हा फोटो प्रचंड हिट ठरला. हा फोटो तब्बल 14 हजार वेळा रिट्विट करण्यात आला. तर या फोटोला 2 लाखापेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. त्यामुळेच विराटच्या या ट्विटला 'गोल्डन ट्विट ऑफ द इयर' चा मान मिळाला आहे.

गेल्या वर्षी अनुष्काने आपल्या सिक्रेट वेडींगची खबर चाहत्यांना लग्नातील फोटो ट्विट करुन दिली होती. त्यावेळेस अनुष्काचं ते ट्विट 'गोल्डन ट्विट ऑफ द इयर' ठरलं होतं.

त्यामुळे गोल्डन ट्विटचा मान मिळण्याची विरुष्काची ही पहिलीच वेळ नाहीये.