![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2018/10/virushka-1-380x214.png)
शनिवारी देशभरात करवा चौथचा सण अगदी उत्साहात साजरा केला गेला. या उत्साहात बॉलिवूड स्टार्स देखील सहभागी झाले होते. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने देखील पती आणि भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले. लग्नानंतरचे अनुष्का-विराटचे हे पहिले करवा चौथ होते. यावेळी अनुष्का-विराटने सोशल मीडियावर फोटो शेअर केला.
या फोटोत दोघेही पारंपरिक वेशात पाहायला मिळत आहेत. दोघांनी एकमेकांसाठी खास संदेश लिहिले. अनुष्काने फोटो शेअर करत लिहिले की, "माझा चंद्र, माझा सूर्य, माझा स्टार, माझं सर्वकाही. करवाचौथच्या सर्वांना शुभेच्छा."
My moon , my sun , my star , my everything
Happy karva chauth to all pic.twitter.com/7saMNS6jdy
— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 27, 2018
तर विराटनेही दोघांचा फोटो शेअर करत लिहिले की, "माझं आयुष्य, माझं विश्व, करवा चौथ."
My life. My universe. Karvachauth @AnushkaSharma pic.twitter.com/a2v18dh8rH
— Virat Kohli (@imVkohli) October 27, 2018
अनुष्का शर्मा लवकरच शाहरुख खानच्या 'झीरो' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. या सिनेमात कतरिना कैफ देखील प्रमुख भूमिकेत आहे. हा सिनेमा 21 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येईल.