यावेळी क्रिकेटविश्वातील अधिकाधिक क्रिकेटपटू कामाच्या ओझ्याखाली दबलेले आहेत. अगदी भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील या कामाच्या बोजाविषयी आधीच बोलला आहे. कोहली आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन हे सर्व फॉर्मेटमध्ये संघाचे नेतृत्व करणारे कर्णधार आहेत. ज्यामुळे त्यांच्यावर दबावही जास्त असतो. अशा वेळी जेव्हा ‘वर्कलोड’ हा शब्द अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी वापरला आहे, तेव्हा कोहलीने 2023 विश्वचषक (World Cup) नंतर तीनपैकी एका फॉर्ममधून निवृत्त होण्याचे संकेत देऊन आपल्या सहकाऱ्यांच्या विचारांना प्रतिबिंबित केले आहे. न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामान्याआधी कोहलीने 2021 आणि 2023 विश्वचषक मध्ये खेळल्यानंतर त्यापैकी एका फॉर्मेटचा त्याग करण्याचा विचार केला जाऊ शकतो असे मत व्यक्त केले. ऑस्ट्रेलियाचा सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरने यापूर्वीच 2021 टी-20 विश्वचषकानंतर क्रिकेटच्या या फॉरमॅटमधून निवृत्ती घेण्याचे स्पष्ट केले. भारतीय कर्णधारांवरील कामाचा ताणही वाढत आहे आणि एक फॉरमॅटमधून निवृत्त होण्याचा इशारा दिला आहे. (IND vs NZ Test 2020: टीम इंडियाचे 'हे' 3 खेळाडू सिद्ध होऊ शकतात हुकुमी इक्का, मिळवून देऊ शकतील विजय)
भारत 2023 विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करत आहे आणि कोहलीला संघाच्या कार्यक्रमानिमित्त त्याच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये असण्याची गरज असल्याची जाणीव आहे. विराट म्हणाला की,"मी त्याच तीव्रतेसह पुढे सर्व चालू ठेवू शकतो आणि हे देखील समजून घेऊ शकतो की पुढच्या दोन ते तीन वर्षांत संघाला माझं खूप योगदान हवं आहे, जेणेकरून आम्ही पाच-सहा वर्षांपूर्वी सामना केलेल्या दुसर्या संक्रमणामध्ये सुलभ होऊ शकू." जगातील तंदुरुस्त खेळाडूंपैकी एक कोहलीने वर्षात 300 दिवस क्रिकेट खेळत असल्याच्या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकला आणि यामुळे त्याच्या शरीरावर त्रास होत असल्याचे म्हटले. "हे आपण कोणत्याही प्रकारे लपवू शकत नाही हे संभाषण नाही. आता मी वर्षाच्या 300 दिवस खेळत आहे, यामध्ये प्रवास आणि सराव सत्रांचा समावेश आहे. आणि तेथे सर्व वेळ तीव्रता असते. त्यामुळे तुमचे नुकसान होईल, असे भारतीय कर्णधार म्हणाला.
For at least the next 2-3 years, Virat Kohli is prepared to give it all#NZvIND pic.twitter.com/GRBRxb2Rv8
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) February 19, 2020
सध्या रोहित शर्मा, शिखर धवन, हार्दिक पंड्या आणि भुवनेश्वर कुमार हे काही खेळाडू दुखापतीतून सावरत आहेत. दिल्लीचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने नुकतंच न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाच्या टेस्ट टीममध्ये पुनरागमन केले आहे. 21 फेब्रुवारीपासून दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे.