न्यूझीलंड (New Zealand) दौऱ्यावर टीम इंडियाने (India) टी-20 मालिकेत 5-0 आणि वनडे मालिकेत किवीने 3-0 अशा क्लीन स्वीपनंतर दोन्ही संघ टेस्ट मालिकेत आता आमने-सामने येतील. भारत-न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील पहिला सामना 21 आणि दुसरा सामना 29 फेब्रुवारू रोजी खेळला जाईल. टी-20 मालिकेत क्लीन स्वीपला सामोरे गेल्यावर किवी संघाने वनडे मालिकेत पुनरागमन केले आणि टीम इंडियाचा क्लीन स्वीप केला. आता खेळाच्या मोठ्या स्वरूपात दोन्ही देशांमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळेल. वनडे मालिकेत क्लीन स्वीप झाल्यावरही टीम इंडियाकडे असे खेळाडू आहेत जे त्यांना टेस्ट मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवून देऊ शकतात. फलंदाजांपासून गोलंदाजांपर्यंत टीम इंडियाचे खेळाडू त्यांच्या खेळणे सामना बदलू शकतात. (IND vs NZ Test 2020: टेस्ट मालिकेत न्यूझीलंडचा 'हा' गोलंदाज ठरू शकतो धोकादायक, टीम इंडियाला राहावे लागणार सावध)
विराट कोहली (Virat Kohli) च्या नेतृत्वात टीम इंडिया किवी दौरा टेस्ट मालिका जिंकून दौऱ्याचा शेवट गोड करून पाहत असेल. पण त्याच्यासाठी त्यांच्या तीन महत्वपूर्ण खेळाडूंना फॉर्ममध्ये असणे महत्वाचे आहे. जाणून घ्या:
चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara)
टीम इंडियाची मधलीफळी सध्या कमकुवत मानली जाते. सध्या मर्यादित शतकारांमध्ये श्रेयस अय्यरने त्याला मजबूत केले, तर टेस्टमध्ये पुजारा इथे चांगली करत आला आहे. भारताच्या आघाडीचे फलंदाज पुजाराने अनेकदा संघाला मुश्किल स्थितीतून बाहेर काढले आले आणि न्यूझीलंडविरुद्धही त्याच्याकडून अशाच कामगिरीची अपेक्षा केली जाईल. पुजाराने न्यूझीलंड इलेव्हन आणि त्याआधी 'अ' टीमविरुद्ध अर्धशतकी कामगिरी केली होती. टीम इंडियाला जर मोठी धावसंख्या करायची असेल तर पुजाराला जबाबदारी घ्यावी लागेल आणि विजयात एक अनुभवी खेळाडू म्हणून महत्वाची भूमिका निभवावी लागेल. पुजाराचा न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्डही चांगला आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah)
न्यूझीलंडविरुद्ध सराव सामन्यात बुमराहने गोलंदाजांची अनुकूल खेळपट्टीचा फायदा घेत किवी संघाला चेतावणी दिली. बुमराहने विकेट घेत पुनरागमन केले जे भारतासाठी हे मोठा दिलासा आहे. दुखापतीतून पुनरागमन झाल्यापासून भारताला बुमराहच्या फॉर्मबद्दल फारशी चिंता होती पण त्याने सराव सामन्यात 2 गडी बाद करून सर्वांना शांत केले. बुमराहलाटी-20 आणि वनडे मालिकेत विकेट मिळाले नसले तरीही त्याच्या विरुद्ध अनेक किवी फलंदाज संघर्ष करताना दिसले.
मोहम्मद शमी (Mohammed Shami)
विश्वचषशकमधील प्रभावी गोलंदाजीनंतर शमी भारताचा प्रमुख गोलंदाज बनला आहे. या दौऱ्यावर त्याने 4 सामने खेळले ज्यात त्याला वनडे वगळता टी-20 सामन्यात विकेट घेण्यात अपयश आले. मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात 3 गडी बाद केले. शमीने मागील अनेक सामन्यांमध्ये गोलंदाजीने चांगली कामगिरी केली आणि जर किवी खेळपट्टीवर त्याला विकेट घेण्याचे यश मिळाले तर टीम इंडियाचा विजय निश्चित आहे.
शिवाय, मालिकेआधी भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे इशांत शर्मा लाही फिट जाहीर केले आहे. बुमराह, शमीसारख्या धोकादायक गोलंदाजांसमवेत इशांत न्यूझीलंडसमोर मोठे आव्हान देण्यासाठी सज्ज असेल.