IND vs NZ Test 2020: टेस्ट मालिकेत न्यूझीलंडचा 'हा' गोलंदाज ठरू शकतो धोकादायक, टीम इंडियाला राहावे लागणार सावध
न्यूझीलंड क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter/@BlackCaps0

21 फेब्रुवारीपासून सुरु होणाऱ्या दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) आमने-सामने येणार आहे. दोन्ही देशांनी या मालिकेसाठी टेस्ट टीम जाहीर केली आहे. न्यूझीलंडने काइल जैमीसन याला पदार्पणाची संधी दिली असून अनुभवी वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trent Boult) ही परतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे सामन्यात दुखापतीनंतर बोल्टला भारतविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेतून बाहेर राहावे लागले होते. टी-20 मालिकेत किवी संघाचा क्लीन स्वीप केल्यावर वनडे मालिकेत त्यांना लज्जास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे, त्यांच्यासाठी ही मालिका सोप्पी राहणार हे नक्की आहे. न्यूझीलंडविरुद्ध होणारी ही मालिका आयसीसी टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत खेळली जाईल. टीम इंडियासध्या 360 गुणांसह अव्वल स्थानावर आहे, तर किवी टीमकडे 60 गुण आहेत आणि ते सहाव्या स्थानावर आहेत. वनडे मालिकेत यजमान न्यूझीलंडसाठी वेगवान गोलंदाज बोल्ट धोकादायक ठरू शकतो. (IND vs NZ Test 2020: टीम इंडियाविरुद्ध टेस्ट मालिकेसाठी ट्रेंट बोल्ट चे न्यूझीलंड संघात पुनरागमन, पाहा कोणाला मिळाली संधी)

बोल्ट दुखापतीनंतर पुनरागमन करत आहे. किवी संघ बोल्टवर वेगवान गोलंदाजीत अवलंबून राहू शकेल असा गोलंदाज आहे. भारतीय फलंदाजांना बोल्टविरुद्ध संघर्ष करताना पहिले जाऊ शकते. बोल्टने भारतविरुद्ध आजवर 13 टेस्ट सामन्यात 24 विकेट्स घेतल्या आहेत, ज्या कोणताही संघाविरुद्ध दुसऱ्या सर्वाधिक आहेत. बोल्टने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 11 सामन्यात 29 गडी बाद केले आहेत. भारताच्या प्रबळ बॅटिंग लाईन-अपला आऊट करून त्यांना मुश्किलीत पाडण्यासाठी केन विल्यमसन अनुभवी बोल्टवर अवलंबून असेल. शिवाय, दुखापतीमुळे तब्बल एक महिन्यानंतर पुनरागमन करणारा बोल्ट आपला ठसा उमटवण्यास आतुर असेल.

भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेचा पहिला सामना 21 आणि दुसऱ्या 29 फेब्रुवारीपासून खेळला जाणार आहे. पहिला सामना वेलिंग्टन (Wellington) च्या बेसिन रिझर्व (Basin Reserve) मैदानावर आणि दुसरा क्राइस्टचर्चच्या हॅग्ली ओव्हलमध्ये खेळला जाईल. भारताने टी-20, किवी टीमने वनडे सामन्यात उत्तम कामगिरी केल्याने मजबूत आणि संतुलित संघांमधील मालिका अपेक्षा जास्त मनोरंजक असेल.