ट्रेंट बोल्ट

मर्यादित ओव्हर्सच्या क्रिकेटनंतर भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) आता क्रिकेटच्या मोठ्या स्वपरुपात आमने-सामने येण्यास सज्ज आहे. दोन्ही देशांमधील 2 सामन्यांची टेस्ट मालिका 21 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. किवीजचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट (Trend Boult) उजव्या हाताच्या फ्रॅक्चरमधून बारा झाला असून न्यूझीलंडच्या 13-सदस्यीय संघात त्याचा समावेश करण्यात आला आहे. डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात बोल्टला दुखापत झाली होती त्यानंतर त्याला भारतविरुद्ध पाच टी-20 आणि तीन वनडे सामन्यांच्या मालिकेला मुकावे लागले होते. टीम इंडियाने टी-20 मालिकेत पहिल्यांदा किवींचा पहिल्यांदा क्लीन स्वीप केला, तर वनडेत यजमान संघाने पुनरागमन करत भारतावर वर्चस्व राखले. त्यामुळे, दोन्ही देशांमधील टेस्ट सामन्यात जोरदार लढत पाहायला मिळेल हे नक्की. (IND vs NZ Test: न्यूझीलंड XI विरुद्ध सराव सामन्यात सलग षटकार रिषभ पंत याने किवी संघाला दिली चेतावणी, पाहा Video)

दुसरीकडे, काईल जेमीसन (Kyle Jamieson) याने भारताविरुद्ध वनडे मालिकेत प्रभावी पदार्पण केले त्याचाही समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध टेस्ट सामन्यात लॉकी फर्ग्युसनच्या जागी जैमीसनची यापूर्वी करण्यात आली होती. एजाज पटेल (Ajaz Patel) ला स्पेशलिस्ट स्पिनर तर डॅरेल मिशेल (Daryl Mitchell) चा अष्टपैलू खेळाडू म्हणून समावेश झाला आहे. दरम्यान, वेलिंग्टनमधील पहिला टेस्ट सामना अनुभवी रॉस टेलरचा 100 वा सामना असेल जो खेळाच्या सर्व स्वरूपात असा महत्त्वाचा टप्पा गाठणारा पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ठरेल. या मालिकेपूर्वी दोन्ही देशांमध्ये सराव तीन दिवसांचा सामना खेळवण्यात आला जो की अनिर्णित राहिला. भारतीय फलंदाजांना सुरुवातील संघर्ष करावा लागला, तर गोलंदाजांनी चांगला खेळ केला. मालिकेतील पहिला सामना 21 फेब्रुवारी, तर दुसरा सामना 29 फेब्रुवारीला खेळवण्यात येईल.

पाहा भारतविरुद्ध न्यूझीलंड टेस्ट टीम:

केन विल्यमसन (कर्णधार), टॉम ब्लंडेल, ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रैंडहोम, काईल जेमीसन, टॉम लाथम, डेरिल मिशेल, हेन्री निकॉल्स, एजाज पटेल, टिम साउथी, रॉस टेलर, नील वैगनर, बीजे वॉटलिंग.