IND vs NZ Test: न्यूझीलंड XI विरुद्ध सराव सामन्यात सलग षटकार रिषभ पंत याने किवी संघाला दिली चेतावणी, पाहा Video
रिषभ पंत (Photo: Getty Images)

भारत (India)-न्यूझीलंड (New Zealand) इलेव्हन संघातील खेळलेला तीन दिवसीय सराव सामना अनिर्णित राहिला. सामन्याच्या तिसर्‍या आणि शेवटच्या दिवशी भारताने दुसर्‍या डावात चार विकेट्स गमावून 252 धावा केल्या. भारतासाठी चांगली गोष्ट अशी होती की सलामीवीर मयंक अगरवाल फॉर्ममध्ये परतला. मयंकने 81 धावा केल्या. त्याच्याशिवाय रिषभ पंत (Rishabh Pant) ने 70 धावांचे योगदान दिले. पंतने फॉर्ममध्ये परतत किवी संघांला आगामी टेस्ट मालिकेआधी चेतावणी जाहीर केली. न्यूझीलंडविरुद्ध टी-20 आणि वनडे मालिकेदरम्यान पंतचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला नव्हता. गेल्या महिन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात कनकशन झाले होते. त्याच्यानंतर केएल राहुल याला विकेटकीपिंगची जबाबदारी देण्यात आली होती. न्यूझीलंडविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत पंत फिट असूनही राहुलला भारताचा विकेटकीपर म्हणून कायम ठेवण्यात आले होते. पण, आता न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध पहिल्या अनधिकृत कसोटी सामन्याआधी पंतने टीम इंडियात सर्वात लांब फॉर्मेटमध्ये फलंदाजी करण्यासाठी विश्वास ठेवला जाऊ शकतो हे दाखवले. (जिमी नीशम याने केएल राहुल ला दिले 'पेपर,सीजर,रॉक' चे चॅलेंज, सुपर ओव्हरऐवजी ICC करू शकते या गेमचा वापर)

65 चेंडूत 70 धावांच्या तडाख्याने त्याने चौकार आणि चार षटकार ठोकले. यात ईश सोढी च्या चेंडूवर सलग दोन षटकारांचाही समावेश आहे. हॅमिल्टन येथे न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध सराव सामन्याच्या शेवटच्या दिवशी फलंदाजी करत पंतने सोढीच्या चेंडूवर सलग दोन षटकार लगावले. पाहा व्हिडिओ:

2 सामन्यांच्या टेस्ट मालिकेआधी झालेल्या सराव सामन्यात मयंक आणि पंतने 100 धावांची भागीदारी केली तर पृथ्वी शॉने 31 चेंडूत द्रुतगती 39 धावा केल्या. 182 च्या एकूण धावसंख्येवर मयंक रिटायर्ड हर्ट झाला. त्याने आपल्या खेळीत 99 चेंडूंचा सामना करत 10 चौकार आणि तीन षटकार ठोकले. रिद्धिमान साहानेही त्याच्या प्रतिष्ठेनुसार कामगिरी केली आणि 38 बॉलमध्ये नाबाद 30 धावा फटकावल्या. शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला आणि त्याने केवळ नऊ धावा करता आल्या. दरम्यान दोन्ही देशांमधील पहिला टेस्ट 21 फेब्रुवारीपासून खेळला जाईल.