जिमी नीशम याने केएल राहुल ला दिले 'पेपर,सीजर,रॉक' चे चॅलेंज, सुपर ओव्हरऐवजी ICC करू शकते या गेमचा वापर
जिमी नीशम आणि केएल राहुल (Photo Credits: Twitter|@JimmyNeesh)

भारत (India) आणि न्यूझीलंड (New Zealand) मधील वनडे मालिकेतील अंतिम सामना मंगळवारी. न्यूझीलंडने मालिकेत तीनही सामन्यात अष्टपैलू कामगिरी करत टीम इंडियाचा मालिकेत 3-0 असा क्लीन स्वीप केला. टीम इंडियाच्या पराभवानंतर त्यांच्यासाठी सकारात्मक राहिलेली बाब म्हणजे विकेटकीपर-फलंदाज केएल राहुल (KL Rahul) याचा फॉर्म. टी-20 आणि नंतर वनडेत जबरदस्त कामगिरी करत राहुलने सर्वांना प्रभावित केले. अंतिम सामन्यात राहुलने शतकी खेळ केला पण, भारताला विजय मिळवून देण्यासाठी तो पुरेसा नव्हता. या सामन्यानंतर न्यूझीलंडच्या जेम्स (जिमी) नीशम (James Neesham) याने ट्विटरवर पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये नीशमने राहुललाही टॅग केले. आगामी आयपीएल (IPL) मोसमात राहुल आणि नीशम किंग्स इलेव्हन पंजाब फ्रॅन्चायसीकडून खेळतील. राहुल यंदा या संघाचे नेतृत्व करताना दिसेल. (Video: तिसऱ्या वनडे मॅचमध्ये धाव घेताना जेम्स नीशम ने अडवला केएल राहुल चा मार्ग, दोघांमध्ये रंगली मजेदार चर्चा)

नीशमने भारत-न्यूझीलंडमधील तिसऱ्या वनडे मॅचमधील एका क्षणाचा फोटो शेअर केला. या फोटोत नीशम आणि राहुल एकत्र उभे आहेत आणि एकमेकांना बोलताना दिसत आहे. यासह नीशम लिहिले, "पेपर्स, सीझर, रॉक?" या फोटोमध्ये नीशम आणि राहुल एकमेकांशी भिडण्याचा प्रयत्न करत आहे. नीशमच्या या फोटोवर आयसीसीने मजेदार प्रतिक्रिया दिली. आयसीसीने नीशमने शेअर केलेला फोटो रिट्विट केला आणि लिहिले की, "कदाचित आम्ही सुपर ओव्हर्सऐवजी याचा वापर करू शकतो?" मागील 6-7 महिन्यांत न्यूझीलंडला खेळलेल्या सर्व 4 सुपर ओव्हर सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

नीशमच्या ट्विटवर आयसीसीची प्रतिक्रिया

दरम्यान, खराब गोलंदाजीमुळे भारताला मालिकेच्या तिसर्‍या सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. सध्या जगातील सर्वोत्कृष्ट वेगवान गोलंदाज मानल्या जाणार्‍या जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. यासह संघाचे क्षेत्ररक्षणही खूप खराब राहिले आणि कर्णधार विराट कोहली यानेही ही त्रुटी मान्य केली. यापूर्वी, भारताने 5 सामन्यांची टी-20 मालिका 5-0 ने जिंकली. आता दोन्ही संघ दोन सामन्यांच्या टेस्ट मालिकेत आमने-सामने येतील.