IND vs ENG: इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनो सावधान; भारतात येण्याआधीच माजी कर्णधार नासिर हुसेन यांनी संघाला दिला इशारा
Nasser Hussain (Photo Credit: Twitter)

Eng Tour of India 2021: ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथा कसोटी सामना जिंकून भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एकदिवसीय मालिका गमवल्यानंतर भारतीय संघाने टी-20 आणि कसोटी मालिकेत दमदार प्रदर्शन केले आहे. आता भारताची पुढील कसोटी मालिका इंग्लंडविरूद्ध घरच्या मैदानावर असणार आहे. यासाठी इंग्लंडचा संघ लवकरच भारतात दाखल होणार आहे. मात्र, याआधीच इंग्लंडच्या माजी कर्णधार नासिर हुसेन (Nasser Hussain) यांनी इंग्लंडच्या संघाला सावधानीचा इशारा दिला आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्मात आहे. घरच्या मैदानात त्यांची कामगिरी नेहमीच चांगली राहिली आहे. यामुळे या दौऱ्यावर भारतीय संघाला कमी लेखता येणार नाही, असेही हुसेन म्हणाले आहेत.

दरम्यान, नासिर हुसेनने स्काय स्पोर्ट्सशी बोलताना म्हणाले की, "ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाने नुकतीच कसोटी मालिका जिंकली आहे. या कसोटी मालिकेच्या सुरुवातील भारतीय संघ डगमगताना दिसला. तसेच पहिल्या कसोटी सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर भारताचा कर्धणार विराट कोहली पालकत्व रजा घेऊन मायदेशी परतला. एवढेच नव्हेतर, भारतीय संघातील आघाडीचे गोलंदाज दुखापतीमुळे संघाबाहेर पडले. मात्र, असे असतानाही भारतीय संघाने दमदार पुनरागमन केले आणि कसोटी मालिकेत 2-1 असा विजय मिळवला. यामुळे भारतीय संघाला अजिबात कमी लेखून चालणार नाही. आणि त्यांच्यावर दबावही टाकता येणार नाही” असे नासिर हुसेन म्हणाले आहेत. हे देखील वाचा- IND vs ENG Series 2021: भारत-इंग्लंड यांच्यातील या मालिकेसाठी स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या एन्ट्रीला BCCI ग्रीन सिग्नल देण्यास उत्सुक, पण एकच अडचण

इंग्लंड-भारत क्रिकेट सामन्यांचे वेळापत्रक-

कसोटी मालिका-

- पहिला सामना (5-9 फेब्रुवारी 2021, चेन्नई)

- दुसरा सामना (13-17 फेब्रुवारी 2021, चेन्नई)

- तिसरा सामना (डे-नाइट सामना, 24-28 फेब्रुवारी 2021, चेन्नई)

- चौथा सामना (4-8 मार्च 2021, अहमदाबाद)

टी20 मालिका-

- पहिला टी20 सामना (12 मार्च 2021,अहमदाबाद)

- दुसरा टी20 सामना (14 मार्च 2021, अहमदाबाद)

- तिसरा टी20 सामना (16 मार्च 2021,अहमदाबाद)

- चौथा टी20 सामना (18 मार्च 2021, अहमदाबाद)

- पाचवा टी20 सामना (20 मार्च 2021, अहमदाबाद)

एकदिवसीय मालिका-

पहिला सामना (23 मार्च 2021, पुणे)

दुसरा सामना (26 मार्च 2021, पुणे)

तिसरा सामना (28 मार्च 2021, पुणे)

एकीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने दमदार कामगिरी बजावली आहे. तर, दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने कालच श्रीलंकेविरूद्धची कसोटी मालिका 2-0ने जिंकली आहे. यामुळे भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामने रंगतदार होण्याची शक्यता आहे.