Robin Uthappa On Virat Kohli: भारतासाठी 2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाने अनेक कटू आठवणी सोडल्या आहेत. न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करून भारतीय संघ बाहेर पडला आणि हा सामना माजी कर्णधार एमएस धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामनाही होता. या विश्वचषकापूर्वीही संघ निवडीबाबत वाद निर्माण झाला होता कारण त्यावेळी चाहत्यांचा आवडता अंबाती रायुडू संघात नव्हता. आता माजी भारतीय खेळाडू रॉबिन उथप्पाने 2019 च्या (Robin Uthappa) एकदिवसीय विश्वचषकात तत्कालीन कर्णधार विराट कोहलीवर (Virat Kohli) अंबाती रायुडूसोबत (Ambati Rayudu) गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप केला आहे. उथप्पाने असा दावा केला आहे की कोहलीने रायुडूवर भारतीय संघाचा दार बंद करण्याचा निर्णय घेतला. एवढेच नाही तर उथप्पाने कोहलीवर त्याच्या कर्णधारपदाच्या काळात युवराज सिंगशी कठोर वागण्याचा आरोप केला आहे.
विराट कोहलीने रायुडूसाठी टीम इंडियाचे दरवाजे बंद केले आहेत: उथप्पा
खरं तर, लल्लंटॉप शोमध्ये रॉबिन उथप्पाने दावा केला की विराट कोहली अशा सर्व लोकांना टाळायचा ज्यांना तो आवडत नव्हता किंवा जे त्याच्या मते चांगले नव्हते. रायुडूवर संघाचे दरवाजे बंद केल्याबद्दल त्याने माजी भारतीय कर्णधारावर हल्ला चढवला. तो म्हणाला की, रायुडूकडे एकदिवसीय विश्वचषक संघाचा भाग होण्यासाठी सर्व क्षमता असूनही त्याला बाहेर ठेवणे योग्य नाही.
Robin Uthappa : "Virat Kohli played dirty politics with Ambati Rayudu and removed him from the 2019 World Cup squad due to personal grudges. This is what makes Rohit Sharma a better leader than him." pic.twitter.com/Y6nPAEVobF
— 𝐉𝐨𝐝 𝐈𝐧𝐬𝐚𝐧𝐞 (@jod_insane) January 13, 2025
'विश्वचषकाचे कपडे, किट बॅग सगळं तयार होतं'
उथप्पा म्हणाला की जर त्याला (विराट कोहली) कोणी आवडत नसतं, त्याला वाटत नसतं की कोणीतरी चांगले आहे, तर तो त्याला काढून टाकला असता. अंबाती रायुडू हे याचे सर्वात मोठे उदाहरण आहे. प्रत्येकाची स्वतःची आवडनिवड असते, मी त्याच्याशी सहमत आहे, पण शेवटच्या क्षणी खेळाडूला घेतल्यानंतर तुम्ही त्याच्यासाठी दरवाजे बंद करू शकत नाही. त्याच्या घरी वर्ल्ड कपचे कपडे, वर्ल्ड कप किट बॅग, सगळं काही होतं. एखादा खेळाडू कदाचित असा विचार करत असेल की तो विश्वचषकात जाणार आहे, पण तुम्ही त्याच्यासाठी दरवाजे बंद केले. माझ्या मते, हे अजिबात योग्य नव्हते.
रायुडूच्या जागी विजय शंकरची निवड
2019 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अगदी आधी, जेव्हा अंबाती रायुडूला संघातून वगळण्यात आले आणि त्याच्या जागी विजय शंकरची निवड करण्यात आली, तेव्हा वाद सुरू झाला. यानंतर, हैदराबादच्या फलंदाजाने खुलासा केला की त्याचे तत्कालीन निवडकर्ता एमएसके प्रसाद यांच्याशी चांगले संबंध नव्हते.