New Year Vacation नंतर नताशा स्टॅनकोविच-हार्दिक पंड्या, विराट कोहली-अनुष्का शर्मा मायदेशी परतले, मुंबई एअरपोर्टवर झाले स्पॉट, पाहा (Photos)

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि पत्नी-बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) समवेत स्वित्झर्लंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवून गुरुवारी सकाळी मुंबईला परतला. कोहली आणि अनुष्का नवीन वर्षाच्या सुट्टीनंतर मुंबई (Mumbai) विमानतळावर स्पॉट झाला होता. कोहलीने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरुन अनुष्कासोबत फ्लाइटमधून एक फोटोही पोस्ट केला होता आणि लिहिले होते: "घरी परत उड्डाण घेताना आम्हाला हसू येते." यापूर्वी कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासह त्यांच्या चाहत्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी एक छोटा व्हिडिओ पोस्ट केला होता. व्हिडिओ शेअर करताना विराटने कॅप्शनमध्ये लिहिले की, "आपणा सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. व्हिडीओमध्ये विराट म्हणाला," आम्ही या सुंदर हिमनगात आहोत आणि आम्ही विचार केला आहे की सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्यावा." (हार्दिक पंड्या याने गुपचूप केला गर्लफ्रेंड नताशा स्टॅनकोविच सोबत साखरपुडा, कोण आहे 'DJ Wale Babu' गाण्यातील सर्बियाई मॉडेल, जाणून घ्या)

कोहली व्यतिरिक्त भारतीय संघाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ही नवीन वर्षाच्या निमित्ताने प्रेयसी नताशा स्टॅनकोविच (Natasa Stankovic) बरोबर दुबईमधून पुन्हा भारतात परतला आहे. नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनदरम्यान हार्दिकने गर्लफ्रेंड नताशाला प्रोपोस केले आणि दोंघांनी सर्वांना चैत करत समुद्राच्या मध्यभागी साखरपुडा केला. गुरुवारी मुंबई विमानतळावर हार्दिक आणि नताशा स्पॉट झाले. या दरम्यान हार्दिकचा भाऊ क्रुणाल त्याची पत्नी पंखुरी शर्मासमवेत दिसला. थायलंडमध्ये नवीन वर्षाची सुट्टी घालवल्यानंतर भारतीय सलामी फलंदाज केएल राहुल देखील बॉलिवूड अभिनेत्री अथिया शेट्टीसमवेत मुंबई विमानतळावर दिसला. असे मानले जाते की हे दोघे एकमेकांना डेट करत आहेत.

पाहा टीम इंडियाच्या या क्रिकेटपटूंचे 'हे' फोटोज:

विराट-अनुष्का

विराट कोहली-अनुष्का शर्मा (Photo Credit: Viral Bhayani)

हार्दिक पंड्या 

हार्दिक पंड्या (Photo Credit: Viral Bhayani)

नताशा स्टॅनकोविच

नताशा स्टॅनकोविच (Photo Credit: Viral Bhayani)

कृणाल पंड्या आणि पंखुरी

कृणाल पंड्या-पंखुरी शर्मा (Photo Credit: Viral Bhayani)

दरम्यान, भारतीय संघ श्रीलंकेविरूद्ध 5 जानेवारीपासून टी-20 मालिकेला सुरुवात करणार आहे. भारत-श्रीलंका संघातील पहिला सामान गुवाहाटी स्टेडियममध्ये खेळला जाईल. या मालिकेदरम्यान, दोन्ही संघांमध्ये 3 टी -20 सामने खेळले जातील. यानंतर टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघ 3 सामन्यांच्या मालिकेसाठी आमने-सामने येतील.