विजय हजारे ट्रॉफीमध्ये संजू सॅमसन याचे दुहेरी शतक; लिस्ट ए क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा सह 'या' यादीत झाला समावेश
संजू सॅमसन (Photo Credit: IANS)

भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) याने सध्या सुरु विजय हजारे ट्रॉफीमध्ये (Vijay Hazare Trophy) तुफानी डबल शतक झळकावले आहे. या स्पर्धेच्या आजच्या मॅचमध्ये केरळच्या (Kerala) मधल्या फळीतील फलंदाज संजूने गोवा (Goa) संघाविरुद्ध स्पर्धेचे पहिले द्विशतक झळकावले आहे. यासह संजूने अनेक विक्रमदेखील अर्जित केले आहेत. लिस्ट ए क्रिकेटमध्ये शतककरणारा संजू, सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), वीरेंद्र सेहवाग, रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन, आणि करणवीर कौशल याच्यानंतर सहावा भारतीय फलंदाज आहे. अलूरमध्ये केरळकडून खेळत, 24 वर्षीय विकेटकीपर फलंदाज संजूने गोव्याविरुद्ध जोरदार डबल शतक ठोकत केवळ 125 चेंडूत डझनभर चौकार आणि षटकार ठोकले. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजाने इतके वेगवान दुहेरी शतक केले नाही. दरम्यान, प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये भारताचे आठवे द्विशतक आहे तर घरगुती क्रिकेटमधील हे तिसरे दुहेरी शतक आहे. विशेष म्हणजे रोहितने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ३ दुहेरी शतकं केली आहेत. (Vijay Hazare Trophy 2019: शिवम दुबे चा शानदार खेळ, टीम इंडियात समावेश करण्याची Netizens ची मागणी)

केरळ संघासाठी संजूने नाबाद 212 धावांची खेळी केली. विजय हजारे ट्रॉफीमध्ये कोणत्याही फलंदाजाने केलेल्या या सर्वाधिक धावा आहेत. यापूर्वी, केव्ही कौशल यांनी विजय हजारे स्पर्धेत 202 धावा केल्या होत्या. सॅमसनने 129 चेंडूंत 21 चौकार आणि 10 षटकारांसह 212 धावा फटकावल्या. यादरम्यान, संजूचा स्ट्राईक रेट 164.34 होता, जो की कोणत्याही भारतीयाच्या दुहेरी शतकासाठी सर्वाधिक आहे. संजूचे हे प्रथम श्रेणी कारकीर्दीतील पहिले शतक होते, ज्याचे त्याने दुहेरीत शतकात रूपांतर केले. एकमेव टी -20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणार्‍या संजू सॅमसनला 2015 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये संधी मिळाली नाही. संजूने 2013 मध्ये विकेटकीपर फलंदाज म्हणून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. संजूने झिम्बाब्वेविरुद्ध एकमेव टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 19 धावा केल्या ज्यामध्ये भारत पराभूत झाला. या दुहेरी शतकासह संजूने ५ विक्रमांना गवसणी घातली आहे.

1. विकेटकीपरने केलेली सर्वोच्च धावसंख्या.

2. विजय हजारे मधील सर्वोच्च धावसंख्या

3. भारतीयद्वारे केलेल्या ए लिस्ट क्रिकेटमधील सर्वात वेगवान 200

4. लिस्ट ए क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दोनशे धावा करणारा पहिला भारतीय

5. ए लिस्ट क्रिकेटमधील पहिले दुहेरी शतक

संजूशिवाय सचिन बेबी यानेदेखील शानदार फलंदाजी केली. सचिनने 127 धावा केल्या. संजूच्या या रेकॉर्ड खेळीमुळे केरळ संघाने 50 ओव्हरमध्ये 3 बाद 372 धावा केल्या. संजूने सचिन बेबीसमवेत 338 धावांची भागीदारी केली.