Vijay Hazare Trophy 2019: शिवम दुबे चा शानदार खेळ, टीम इंडियात समावेश करण्याची Netizens ची मागणी
शिवम दुबे (Photo Credit: Facebook)

विजय जारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) मध्ये 10 ऑक्टोबरला कर्नाटक (Karnataka) आणि मुंबई (Mumbai) यांच्यात सामना रंगला. या मॅचमध्ये कर्नाटकने 9 धावांच्या फरकाने विजय मिळवला. पण, या सामन्यात मुंबईचा अष्टपैलू शिवम दुबे याने शानदार खेळ दाखविला आहे आणि क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केले. या सामन्यात शिवमने 67 चेंडूत 118 धावांची शतकी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने 7 चौकार आणि 10 षटकार ठोकले. शिवमच्या शानदार शतकानंतर त्याला टीम इंडियाच्या टी-20 संघात स्थान देण्याची मागणी शोष मीडियावर होत आहे. शिवम हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. फलंदाजी तसेच गोलंदाजीने संघात योगदान देण्याची त्याची क्षमता आहे. आजवर शिवमने घरगुती क्रिकेटमध्ये सलग 5 चेंडूत 5 षटकारदेखील ठोकले आहेत. यामुळे, मागील वर्षी आयपीएलच्या लिलावात त्यांना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) ने 5 कोटींची मोठी रक्कम देऊन खरेदी केले होते.

कर्नाटक आणि मुंबईच्या मॅच दरम्यान, दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये बॅट आणि बॉलने जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. यादरम्यान, शिवमने लिस्ट ए क्रिकेटमधील पहिले शतक केले. दुबेने 118 पैकी 88 धावा चौकार ठोकून केल्या. यानंतर सोशल मीडियावर शिवमचा आगामी बांग्लादेशविरुद्ध मॅचसाठी समावेश करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. पहा शिवमच्या शतकानंतर ट्विटरवर लोकांच्या प्रतिक्रिया:

शिवम दुबे वनडे आणि टी-20 या दोघांमध्ये यावा

विराट कोहली -एबी डिव्हिलियर्स यांना परेशान करणाऱ्या गोपालवर शिवमने  जोरदार आक्रमण केले 

शिवमचे बांगलादेश मालिकेसाठी टीम शीटवर पहिले नवीन नाव असलेच पाहिजे

लहान पंड्या संघात नसताना शिवमला संधी दिली पाहिजे

कृपया बांगलादेश टी -20 मालिकेसाठी शिवमची निवड करा

शिवम त्याच्या झटपट फलंदाजीमुळे तो चर्चेत आला होता. रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या टीमने त्याला पाच कोटी रुपयांच्या मोबदल्यात विकत घेतले. पण आयपीएल 2019 मध्ये तो फक्त 4 सामने खेळू शकला. यात तो काही खास कामगिरी करू न शकल्यामुळे विराट कोहलीने त्याला बाद केले. उर्वरित हंगामात नंतर त्याला संधी मिळाली नाही. मात्र, यापूर्वी त्याने विजय हजारे ट्रॉफी आणि इंडिया ए संघासाठी शानदार प्रदर्शन केले आहे.