भारतीय संघाचा माजी दिग्गज सुरेश रैना (Suresh Raina) सध्या त्याच्या कारकिर्दीच्या खडतर टप्प्यातून जात आहे. आयपीएल 2022 लिलावात (IPL Auction) त्याच्यासाठी एकही फ्रँचायझीने बोली लावली नाही. तर माजी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) देखील स्वारस्य दाखवले नाही. आता, त्याने बीसीसीआयकडे बिग बॅश लीग (बीबीएल) किंवा कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) सारख्या परदेशी टी-20 लीगमध्ये करारबद्ध नसलेल्या खेळाडूंना खेळण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. रैना गेल्या अनेक मोसमापासून चेन्नई फ्रँचायझी संघाचा भाग होता. पण गेल्या मोसमात रैनाची बॅट शांत होती. आयपीएलच्या (IPL) 14 व्या आवृत्तीत त्याने 12 सामन्यांत 125 च्या स्ट्राइक रेटने 160 धावाच केल्या. त्यानंतर आयपीएल लिलावात फ्रँचायझींनी नकारल्यानंतर रैनाने आपली व्यथा मांडली आहे. (IPL Auction 2022 Unsold Players List: ‘या’ स्टार खेळाडूंवर यंदा बोलीचा दुष्काळ, खरेदीदारच न मिळाल्याने राहणार आयपीएल बाहेर)
बीसीसीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सक्रिय पुरुष क्रिकेटपटूंना परदेशातील स्पर्धांमध्ये भाग घेण्यापासून बंदी आहे. ‘मिस्टर आयपीएल’ नावाने प्रसिद्ध यूपीच्या फलंदाजाने नुकत्याच एका मुलाखतीत आपली व्यथा मांडली होती. यादरम्यान त्यांनी बीसीसीआय आणि ICC कडे दाद मागितली. 35 वर्षीय सुरेश रैनाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो खूपच भावूक झालेला दिसत आहे. रैना व्हिडिओमध्ये म्हणतो, “बीसीसीआयने करार नसलेल्या आयसीसी किंवा फ्रँचायझींशी सल्लामसलत करून खेळाडूंना परदेशात खेळण्याची परवानगी दिली पाहिजे. आपण जिथे जातो तिथे खेळतो. तुम्ही बीसीसीआयच्या करारातही नाही आहात, तुम्हाला आयपीएलमध्ये कोणी घेतलेले नाही, तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटही खेळत नाही, देशांतर्गत क्रिकेट असे आहे की जी स्पर्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर आहे ती देशांतर्गत क्रिकेटमध्ये नाही.”
Please @ImRo45 consider #SureshRaina for #MumbaiIndians team.🙏🇮🇳💙💙#Boycott_ChennaiSuperKings pic.twitter.com/yiCiZX0gbc
— Jyoti Suman (@Jas23478675) February 15, 2022
आयपीएलच्या लिलावात सुरेश रैना 2 कोटीच्या मूळ किमतीत उतरला होता. CSK ने त्याचे वय आणि फॉर्म लक्षात घेऊन त्याच्याकडे दुर्लक्ष केले. आयपीएलचा दिग्गज फलंदाज रैनाने टी-2 लीग स्पर्धेत 5528 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 39 अर्धशतके आणि एक शतक झळकावले आहे. तसेच आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा रैना लीगमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. याशिवाय त्याने पार्ट-टाइम फिरकी गोलंदाजीने 25 विकेटही घेतल्या आहेत.