IPL Auction 2022 Unsold Players List: ‘या’ स्टार खेळाडूंवर यंदा बोलीचा दुष्काळ, खरेदीदारच न मिळाल्याने राहणार आयपीएल बाहेर
आयपीएल लिलाव 2021 (Photo Credit: Twitter/IPL)

IPL Auction 2022 Unsold Players List: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामासाठी खेळाडूंचा दोन दिवसीय लिलाव बंगळुरू (Bangalore) येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रक्रियेदरम्यान तब्ब्ल 600 खेळाडूंवर बोली लावली गेली. भारताचा युवा फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) यावर्षी लिलावातील सर्वात महागडा ठरला. तर लखनौ सुपर जायंट्सने शनिवारी बेंगळुरू येथे झालेल्या आयपीएल 2022 लिलावात (IPL Auction) आवेश खानला 10 कोटी रुपयांत खरेदी केले आणि यावर्षी स्पर्धेतील सर्वाधिक रुपये देऊन खरेदी केलेला महागडा अनकॅप्ड खेळाडू ठरला. याशिवाय अंडर-19 विश्वचषक विजयी कर्णधार यश धुल आणि इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारताच्या विजयी संघाचा शिल्पकार ठरलेला राज अंगद बावा यांना चांगला भाव मिळाला. (IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावात टॉप-5 ‘करोडपती’मध्ये एका विदेशी खेळाडूसह टीम इंडिया धुरंधरांचा जलवा, फ्रँचायझींनी पाण्यासारखा पैसा ओतला)

पण दोन दिवस चाललेल्या प्रक्रियेत काही प्रमुख खेळाडूंना एकही खरेदीदार मिळाला नाही. अशा परिस्थितीत आयपीएल लिलावात अनसोल्ड राहिलेल्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. भारताचा कसोटी क्रिकेट तज्ञ चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), ‘चिन्ना थाला’ किंवा ‘मिस्टर आयपील’ अशा नावाने प्रसिद्ध सुरेश रैना (Suresh Raina), ऑस्ट्रेलियाचा टी-20 वर्ल्ड कप विजेता कर्णधार आरोन फिंच (Aaron Finch) यांच्यासह देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय खेळाडूंनाही दोन दिवसाच्या लिलाव प्रक्रिये दरम्यान खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आता या सर्वच खेळाडूंना आयपीएल बाहेर बसून टी-20 लीगचा आनंद घेणे भाग पडणार आहे.

IPL 2022 Auction Unsold Players List: सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, आदिल रशीद, मुजीब झद्रान, इमरान ताहीर, अॅडम झाम्पा, मोईसेस हेन्रिक्स, अकील होसेन, अमित मिश्रा, रजत पाटीदार, मोहम्मद अझरुद्दीन, विष्णू सोलंकी, स्कॉट कुग्गेलीन, एम. सिद्धार्थ, मथीशा पाथीराना, संदीप लामिछाने, चेतेश्वर पुजारा, डेविड मलान, मार्नस लाबुशेन, कॉलिन मुनरो, इयन मॉर्गन, आरोन फिंच, सौरभ तिवारी, गेराल्ड कोएत्झी, इशांत शर्मा, लुंगी एनगिडी, शेल्डन, शेल्डन, तबरेज शम्सी, दुआन जानसेन, चिंतला रेड्डी, रोहन राणा, कर्ण शर्मा, ईश सोधी, विराट सिंग, सचिन बेबी, हिम्मत सिंग, हरनूर सिंह, रिकी भुई, वासू वत्स, अरझान नागवासवाला, यश ठाकूर, आकाश सिंग, मुजतबा युसूफ, चरिथ असलंका, शिवांक वशिष्ठ, जॉर्ज गार्टन, बेन मॅकडरमॉट, आकाश मधवाल, रहमानुल्लाह गुरबाज, रोहन कदम, समीर रिझवी, तन्मय अग्रवाल, टॉम कोहलर-कॅडमोर,संदीप वॉरियर, रीस टोपले, अँड्र्यू टाय, प्रशांत चोप्रा, पंकज जयस्वाल, युवराज चुडासामा, अपूर्व वानखेडे, अथर्व अंकोलेकर, मिधुन सुधेसन, पंकज जसवाल, बेन द्वारशुईस, मार्टिन गप्टिल, बेन कटिंग, रोस्टन चेस, पवन नेगी, धवल कुलकर्णी, केन रिचर्डसन, लॉरी इव्हान्स, केन्नर लुईस, बी.आर शरथ, हेडन केर, शम्स मुलानी, सौरभ कुमार, ध्रुव पटेल, अतित शेठ, डेविड विसे, सुशांत मिश्रा, आशीर्वाद मुझाराबानी, कौशल तांबे, निनाद रथवा, अमित अली, आशुतोष शर्मा, हरनूर सिंह, शिवांक वशिष्ठ, प्रत्युष सिंग, भरत शर्मा, राहुल चंद्रोल, कुलवंत खेजरोलिया.