IPL 2022 Mega Auction: आयपीएल लिलावात टॉप-5 ‘करोडपती’मध्ये एका विदेशी खेळाडूसह टीम इंडिया धुरंधरांचा जलवा, फ्रँचायझींनी पाण्यासारखा पैसा ओतला
शार्दूल ठाकूर, ईशान किशन (Photo Credit: PTI)

IPL 2022 Mega Auction: बेंगळुरू येथे दोन दिवस चाललेल्या आयपीएल लिलावाची (IPL Auction) प्रक्रिया संपुष्टात आली आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 15 व्या हंगामात खेळण्यासाठी तब्ब्ल 600 खेळाडूंवर बोली लागली त्यापैकी फक्त निवडक खेळाडूंना खरेदी करण्यास रस दाखवला. तर अन्य खेळाडूंना आणखी एक वर्ष या प्रसिद्ध टी-20 मध्ये खेळण्याची प्रतीक्षा आणखी एका वर्षाने वाढली आहे. चेतेश्वर पुजारा, जिमी नीशम, शाकिब अल हसन यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंना लिलावात कोणत्याही फ्रँचायझीने खरेदी केले नाही. तसेच आयपीएल 2022 च्या महागड्या खेळाडूंबद्दल (IPL Expensive Players) बोलायचे तर टॉप-5 च्या यादीत भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला आणि फ्रँचायझींनी हात खोलून त्यांच्यावर पाण्यासारखा पैसा उधळला. दरम्यान आयपीएलचे पहिले पाच महागडे खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत. (IPL 2022 Mega Auction: यंदा IPL खेळणार नाही ‘हा’ खेळाडू, तरीही मुंबई इंडियन्सने उघडली तिजोरी, जाणून घ्या का केले असे)

1. ईशान किशन (15,25 कोटी)

भारताचा स्टार फलंदाज ईशान किशन (Ishan Kishan) ओपनर आणि मधल्या फळीत आक्रमक फलंदाजी करण्यासाठी सक्षम आहे. पाच वेळा आयपीएल चॅम्पियन मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) किशनला लिलावापूर्वी रिलीज केले, पण त्याच्यावर पुन्हा बॅटने कमाल करण्याचा विश्वास दाखवून फ्रँचायझीने यावर्षी लिलावातील सर्वाधिक बोली लावून त्याला खरेदी केले.

2. दीपक चाहर (14 कोटी)

चेन्नई सुपर किंग्सच्या 2019 आणि 2021 चॅम्पियनशिप विजयात दीपक चाहरने (Deepak Chahar) बॉलने निर्णायक भूमिका बजावली आहे. याशिवाय बॅट आणि बॉलने चाहरचा सध्याचा फॉर्म पाहता तो एमएस धोनीच्या नेतृत्वात पुन्हा एकदा कमाल करेल असे अपेक्षित आहे. दीपक गेली चार वर्षांपासून चेन्नई सुपर किंग्ससाठी खेळत आहे.

3. श्रेयस अय्यर (12.25 कोटी)

दिल्ली कॅपिटल्सचा माजी कर्णधार आणि भारताचा स्टायलिश फलंदाज श्रेयस अय्यरला (Shreyas Iyer) या वेळी लिलावात मोठी रक्कम मिळणे अपेक्षित होते. किशन पूर्वी श्रेयस लिलावाचा सर्वात महागडा खेळाडू होता. अय्यरच्या दुखापतीमुळे रिषभ पंतला दिल्लीच्या संघाची कमान देण्यात आली. तर मुंबईकर फलंदाज बरा होऊन परतल्यावरही पंतला कर्णधार म्हणून कायम ठेवण्यात आले. त्यामुळे श्रेयस अय्यरने लिलावापूर्वी दिल्लीची साथ सोडली. आणि आता कोलकाता नाईट रायडर्स संघात पोहोचल्यावर तो KKR चे नेतृत्व करणे अपेक्षित आहे.

4. लियाम लिविंगस्टोन (11.50 कोटी)

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू लियाम लिविंगस्टोन (Liam Livingstone) आयपीएल 2022 लिलावात खरेदी केलेला आघाडीचा परदेशी खेळाडू बनला. पंजाब किंग्सने त्याला 11.50 कोटींच्या विजयी बोलीने विकत घेतली. 28 वर्षीय लिविंगस्टोनसाठी चेन्नई आणि कोलकाता नाईट रायडर्स देखील आग्रही होते. फटके खेळण्यात माहीर लिविंगस्टोन ‘द हंड्रेड’च्या उद्घाटन हंगामात 178.46 च्या स्ट्राइक-रेटने 348 धावा करून सर्वोत्तम खेळाडू ठरला.

5. शार्दूल ठाकूर (10.75 कोटी)

‘पालघर एक्सप्रेस’ म्हणून प्रसिद्ध भारताचा अष्टपैलू खेळाडू शार्दुल ठाकूरला (Shardul Thakur) आयपीएल मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले. चेन्नई सुपर किंग्स फ्रँचायझी संघासाठी यापूर्वी खेळलेल्या शार्दुलसाठी दिल्ली आणि पंजाब किंग्जमध्ये रस्सीखेच पाहायला मिळाली.