जोफ्रा आर्चर (Photo Credit: Twitter /@RajasthanRoyals)

IPL 2022 Mega Auction: दुखापतीमुळे दीर्घकाळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर असलेला कॅरेबियन वंशाचा इंग्लिश वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) पुन्हा एकदा इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) लिलावात मोठी बोली मिळाली आहे. गेल्या मोसमापर्यंत राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) सदस्य असलेल्या आर्चरला मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) 8 कोटी रुपयांना आपल्या संघात समाविष्ट केले आहे. राजस्थानने आर्चरला पुन्हा आपल्या संघात घेण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. पण मुंबई इंडियन्सने त्यांना खडतर आव्हान दिले आणि अखेर आर्चरला आपल्या संघात समाविष्ट करण्यात यश मिळवले. आर्चरने इंग्लंडकडून 13 कसोटी, 17 एकदिवसीय आणि 12 टी-20 सामने खेळले आहेत. आर्चर दुखापतीमुळे (Jofra Archer Injury) यंदाच्या आयपीएलमध्ये (IPL) खेळताना दिसणार नाही. तरीही लिलावात त्याच्यासाठी तिजोरी उघडण्यामागचे कारण काय? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. (IPL 2022 Mega Auction: आला रे! Jofra Archer वर मुंबई इंडियन्सने लावला डाव, 8 कोटीची रक्कम देऊन ‘पलटन’मध्ये केला समावेश)

आयपीएलच्या लिलावात येण्यापूर्वीच त्याने या वर्षी खेळणार नसल्याची माहिती दिली होती तरीही मुंबई इंडियन्सने त्याच्यावर एवढा मोठा सट्टा खेळला आहे. तो बऱ्याच दिवसांपासून कोपऱ्याच्या दुखापतीशी झुंज देत आहे. डिसेंबरमध्ये त्याच्यावर दुसऱ्यांदा शस्त्रक्रिया झाली. तो 2022 टी-20 विश्वचषक, विश्वचषक 2023 मध्ये इंग्लंडकडून खेळण्याचा दावेदार आहे. अशा परिस्थितीत, ECB ने त्याच्या आयपीएल 2022 मध्ये उपलब्धतेवर बंदी घातली होती. दरम्यान आर्चरवर पैसे उधळण्यावर मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी कारण स्पष्ट केले आहे. “मुंबई इंडियन्स लिलावात ईशान किशन आणि जोफ्रा आर्चरसह बाहेर पडतील असे कोणी मला सांगितले तर माझा विश्वास बसला नसता,” अंबानी रविवारी म्हणाले. याशिवाय आकाश अंबानी यांनी पुष्टी केली की जोफ्रा आर्चर आयपीएल 2023 मध्ये येणार आहे. आर्चर 2018 पासून आयपीएलमध्ये खेळला आहे आणि रॉयल्सचे प्रतिनिधित्व करताना त्याने खूप मजबूत छाप पाडली आहे.

मुंबई आणि राजस्थानसह सनरायझर्स हैदराबाद देखील आर्चरला खरेदी करण्यात आग्रही होते. फ्रँचायझी त्याच्यासाठी इतके उत्सुक होते की लिलावकर्ता चारू शर्माने त्यांना आठवण करून दिली की या हंगामात गोलंदाज खेळायला येणार नाही. आर्चरच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल बोलायचे तर लीगमधील त्याच्या तीन सत्रांमध्ये आर्चरचा 35 सामन्यांमध्ये 21.32 च्या सरासरीने 46 विकेट्स आणि 7.13 च्या इकॉनॉमीने अभूतपूर्व विक्रम राहिला आहे.