चेतेश्वर पुजारा (Photo Credit: Twitter/ICC)

टीम इंडियाचा (Team India) दिग्गज कसोटी फलंदाज चेतेश्वर पुजाराने (Chetehwar Pujara) पुन्हा एकदा उत्कृष्ट फॉर्म साधला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या काउंटी क्रिकेटमध्ये (County Championship) त्याने सलग तिसऱ्या सामन्यात शतक झळकावले. त्याने 15 दिवसांत ही 3 शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने एका सामन्यात द्विशतक झळकावून संघाचा पराभव टाळला. काउंटी चॅम्पियशिपमध्ये तो ससेक्स (Sussex) कडून खेळत आहे. यापूर्वी खराब कामगिरीमुळे पुजाराला भारताच्या कसोटी संघातून (India Test Team) वगळण्यात आले होते. तर आयपीएल (IPL) 2022 च्या मेगा लिलावात कोणत्याही संघाने त्याला खरेदी करण्यात रस दाखवला नाही. यानंतर पुजारा इंग्लंडकडे वळला आणि त्याने काउंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला. 167 चेंडूत 107 धावा करणाऱ्या पुजाराने 13 चौकार मारून आपल्या संघाला डरहमविरुद्ध (Durham) चांगली आघाडी मिळवून दिली, जो पहिल्या डावात 223 धावांवर सर्वबाद झाला होता. (County Championship 2022: भारत-पाकिस्तानी क्रिकेटपटू आता एकत्र फलंदाजी करणार! चेतेश्वर पुजारा आणि मोहम्मद रिझवान यांनी Sussex काउंटीसाठी केले पदार्पण)

पुजाराने यंदाच्या त्याच्या काऊन्टी कारकिर्दीत बहुतांश लक्षवेधी कामगिरी केली आहे. त्याने आता त्याच्या पाच डावांमध्ये द्विशतकासह तीन शतके झळकावली आहेत. ससेक्ससाठी पदार्पण करताना पुजाराने 6 धावा आणि नाबाद 201 धावा करून डर्बीशायर विरुद्धचा सामना अनिर्णित राखला. तर Worcestershir विरुद्ध त्याने पहिल्या डावात 109 आणि त्यानंतर 12 धावा केल्या. लक्षणीय आहे की या सामन्यात ससेक्सचा 34 धावांनी पराभव झाला. 4 दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशी वृत्त लिहिपर्यंत ससेक्सने पहिल्या डावात 99 षटकात 5 बाद 350 धावा केल्या. अजून 17 षटके खेळायची असून डरहमने पहिल्या डावात 223 धावा केल्या. अशा प्रकारे त्याच्याकडे 127 धावांची आघाडी आहे. चेतेश्वर पुजारा 198 चेंडूत 128 धावा करून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 15 चौकार मारले आहेत. टॉम क्लार्क 50 आणि टॉम हेन्स 54 धावा करून बाद झाला. तर पुजारासोबत सध्या पाकिस्तानचा मोहम्मद रिझवान 5 धावा करून क्रीजवर आहे.

दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस पुढे ढकलण्यात आलेल्या पाचव्या कसोटीसाठी कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर धावांमुळे पुजाराला भारतीय संघात स्थान मिळण्याची शक्यता आता वाढली आहे. या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत झालेल्या मालिका पराभवानंतर भारतीय संघाच्या अनुभवी फलंदाजाला कसोटी संघातून श्रीलंकेविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेमधून वगळण्यात आले होते.