भारतीय संघाचा (Indian Team) वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) श्रीलंकेला (Sri Lanka) स्वतःहून पराभूत केले तेव्हापासून संपूर्ण क्रिकेट विश्वाला त्याच्या फलंदाजीची खात्री पटली आहे. माजी खेळाडू दीपकशी संबंधित किस्से शेअर करत आहेत आणि त्याच्याबद्दल कधी न ऐकलेल्या गोष्टी देखील आता लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आता भारताचा माजी वेगवान गोलंदाज वेंकटेश प्रसादनेही (Venkatesh Prasad) चाहरबद्दल एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. त्याने माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल (Greg Chappell) यांनी दीपक चाहरला त्याच्या उंचीमुळे नाकारले असल्याचे त्यांनी ट्विटमध्ये उघड केले आहे. श्रीलंकेविरुद्ध दुसर्या वनडे सामन्यात शानदार फलंदाजी करत दीपकने 69 धावांची मॅच-विनिंग खेळी केली. भारताच्या हातून सामना निसटताना दिसत असताना दीपकने क्रीजवर आला आणि उपकर्णधार भुवनेश्वर कुमारला सोबत 8 व्या विकेटसाठी 84 धावांची उत्कृष्ट भागीदारी केली. यासह भारताने एकदिवसीय मालिकादेखील खिशात घातली. (IND vs SL 2nd ODI 2021: चुरशीच्या सामन्यात जबरा फलंदाजीनंतर Deepak Chahar मैदानात ‘हे’ काम करताना दिसला, पाहा Photo)
दीपकबद्दल जुना किस्सा शेअर करत प्रसादने ट्विट केले की, “दीपक चहरला त्याच्या उंचामुळे ग्रेग चॅपेल यांनी नकार दिला आणि दीपकला आणखी काही व्यवसाय निवडण्याचा सल्ला दिला आणि त्याने स्वबळावर सामना जिंकून दिला. कथेचा मुद्दा असा आहे की, स्वतःवर विश्वास ठेवा आणि परदेशी प्रशिक्षकांना फार गंभीरपणे घेऊ नका.” ते पुढे म्हणाले, “हो, याला अपवाद आहेत पण भारताकडे कमालीची प्रतिभा आहे, त्यामुळे संघ आणि फ्रँचायझींनी शक्य तितके भारतीय प्रशिक्षक व मार्गदर्शकांचा विचार करण्याची वेळ आली आहे.” भारत आणि श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिकेचा तिसरा आणि शेवटचा सामना शुक्रवारी कोलंबोमध्ये खेळला जाईल.
Deepak Chahar Was rejected by Greg Chappell at RCA for his height and told to look at a different occupation.
And he single handedly won a match with not even his primary skills.
Moral of the story- Believe in yourself and don't take overseas coaches too seriously. pic.twitter.com/cByzg9uorj
— Venkatesh Prasad (@venkateshprasad) July 21, 2021
दुसरीकडे, भारताचे माजी प्रशिक्षक ग्रेग चॅपेल आणि भारतीय संघ यांच्यातील संबंध खूप वादग्रस्त ठरले आहेत. चॅपेल आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्यातील वाद भारतीय क्रिकेटमध्ये काळ्या अक्षरात नोंदवला गेला आहे. चॅपल यांच्या प्रशिक्षणाखाली 2007 मध्ये झालेल्या विश्वचषकात भारताला अपमानास्पद पराभवाला सामोरे जावे लागले. त्या विश्वचषकात श्रीलंका आणि बांगलादेशसारख्या संघांविरुद्ध पराभूत झाल्यानंतर भारत वर्ल्ड कपमधून बाहेर पडला होता. बर्याच माजी खेळाडूंनी चॅपेलवर आरोप केला की चॅपेलला संघाचा नाश करायचा होता.