सोशल मीडिया प्लॅटफॉर्ममुळे क्रिकेटपटू आणि त्यांचे चाहते पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले आहे. क्रिकेटपटू सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून आपल्या चाहत्यांना त्यांच्या दैनंदिन जीवनाविषयी अपडेटेड ठेवतात तर चाहत्यांनीही त्यांच्या लाडक्या क्रिकेटपटूंचे कौतुक करून पोस्ट पसंत करतात. परंतु प्रत्येक नाण्याच्या दोन बाजू प्रमाणे सोशल मीडिया देखील याला अपवाद नाही. ट्रोल्सने बऱ्याच वेळा क्रिकेटपटूंना शिवीगाळ करण्यासाठी व्यासपीठांचा वापर केला आहे आणि असेच काहीसे गुरुवारी भारताचा माजी अष्टपैलू इरफान पठाणच्या (Irfan Pathan) बाबतीत घडले. एका ट्विटर युजरने इरफान पठाणची तुलना दहशतवादी हाफिज सईदशी (Hafiz Saeed) केली. इस्लामी दहशतवादी पाकिस्तानातून काम करत असून 2008 च्या मुंबई हल्ल्याचा (Mumbai Attack) मुख्य सूत्रधार होता. या हल्ल्यात 164 नागरिकांचा बळी गेला होता. (CSK साठी मोची काम करणाऱ्या भास्करनला इरफान पठाणकडून आर्थिक मदत, सोशल मीडियावर होतंय कौतुक)
“इरफान पठाण पुढील हाफिज सईद होण्याची आपली महत्त्वाकांक्षा अजिबात लपवत नाही. ही गोष्ट घृणास्पद आहे,” एका वापरकर्त्याने इरफानच्यावर टीकेला उत्तर देताना लिहिले. इरफानचे या घृणास्पद ट्विटकडे लक्ष गेले आणि त्याने त्याला वेळ न घालवता त्वरित प्रतिसाद दिला. इरफानने या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आणि यूजरच्या मानसिकतेबद्दल निराशा व्यक्त केली. “ही विशिष्ट लोकांची मानसिकता आहे. आम्ही कुठे पोहोचलो आहोत?" इरफानने ट्विटला लाज, तिरस्कार असे हॅशटॅगही जोडले.
This is the mentality of certain ppl. Where have we reached ? #shame #disgusted pic.twitter.com/nlLh9vTwS6
— Irfan Pathan (@IrfanPathan) July 2, 2020
नुकताच इरफानने जामिया प्रकरणावरही निवेदन जाहीर केले होते. इरफान म्हणाला की जामियामध्ये कोणत्याही धर्माचे लोक अभ्यास करत नाहीत. पठाण म्हणाला की जामियावर ट्विट करण्यापूर्वी प्रत्येक धर्मातील मुलांबरोबर बोललो. पठाण म्हणाला की, त्यांनी केलेले ट्विट देखील चिंतेचे होते, कोणताही लढा देणारं नाही. म्हणून त्यांनी ट्विट केले होते की लोकांचे लक्ष तिथे जाईल आणि काही चुकत असेल तर ते सुधारले जावेत. तो म्हणाला की त्याच्या ट्विटने लोकांचे लक्ष त्या प्रकरणाकडे गेले.