
UP Warriorz vs Royal Challengers Bangalore WPL 2025 Fantasy 11 Prediction: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध यूपी वॉरियर्स (RCB vs UP) महिला प्रीमियर लीग 2025 (Women Premier League 2025) चा नववा सामना एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगळुरू येथे खेळला जाईल. यूपी वॉरियर्सने अलीकडेच दिल्ली कॅपिटल्सला हरवून हंगामातील पहिला विजय नोंदवला. आता ते महिला प्रीमियर लीग 2025 पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहेत. दुसरीकडे, आरसीबी त्यांच्या पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध दारुण पराभव पत्करावा लागला. महिला प्रीमियर लीग 2025 हंगामात दोन्ही संघांमधील हा पहिलाच सामना असेल. यूपी वॉरियर्सने पराभवाने सुरुवात केली. त्यांना प्रथम गुजरात जायंट्सकडून आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सकडून पराभव पत्करावा लागला.
दिल्ली कॅपिटल्सने यूपी वॉरियर्सचा सात विकेट्सने पराभव केला. ज्यामध्ये कर्णधार मेग लॅनिंग, अॅनाबेल सदरलँड आणि संघाच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी करत संघाला सहज विजय मिळवून दिला. गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने गुजरात जायंट्सविरुद्ध विक्रमी विजय मिळवून आपल्या मोहिमेची सुरुवात केली. यानंतर, त्यांनी दिल्ली कॅपिटल्सचा आठ विकेट्सने पराभव केला, परंतु मुंबई इंडियन्सविरुद्ध त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू महिला क्रिकेट संघ: स्मृती मानधना (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, एलिस पेरी, राघवी बिस्ट, रिचा घोष (यष्टीरक्षक), कनिका आहुजा, जॉर्जिया वेअरहॅम, एकता बिश्त, किम गार्थ, व्ही.जे. जोशिता, रेणुका सिंग
यूपी वॉरियर्स महिला क्रिकेट संघ: वृंदा दिनेश, ग्रेस हॅरिस, ताहलिया मॅकग्रा, किरण नवगिरे, उमा छेत्री (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा (कर्णधार), सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, श्वेता सेहरावत, साईमा ठाकोर, क्रांती गौर.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघाचा अंदाज: यष्टिरक्षक- रिचा घोष (आरसीबी) यष्टिरक्षक म्हणून निवडली जाऊ शकते.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघाचा अंदाज: फलंदाज – स्मृती मानधना (आरसीबी), किरण नवगिरे (यूपी वॉरियर्स ), श्वेता सेहरावत (यूपी वॉरियर्स) निवडू शकता.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघाचा अंदाज: अष्टपैलू खेळाडू - दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स), एलिस पेरी (आरसीबी), चिनेल हेन्री (यूपी वॉरियर्स), जॉर्जिया वेअरहॅम (आरसीबी) यांना संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून समाविष्ट करू शकता.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघाचा अंदाज: गोलंदाज - सोफी एक्लेस्टोन (यूपी वॉरियर्स), रेणुका सिंग (आरसीबी), एकता बिश्त (आरसीबी) यांना संघात गोलंदाज म्हणून स्थान देऊ शकतात.
आरसीबी विरुद्ध यूपी वॉरियर्स सामन्यातील सर्वोत्तम ड्रीम 11 संघाचा अंदाज: लाइनअप: रिचा घोष (आरसीबी़), स्मृती मानधना (आरसीबी), किरण नवगिरे (यूपी वॉरियर्स), श्वेता सेहरावत (यूपी वॉरियर्स), दीप्ती शर्मा (यूपी वॉरियर्स), एलिस पेरी (आरसीबी), चिनेल हेन्री (यूपी वॉरियर्स), जॉर्जिया वेअरहॅम (आरसीबी), सोफी एक्लेस्टोन (यूपी वॉरियर्स), रेणुका सिंग (आरसीबी), एकता बिश्त (आरसीबी)