Photo Credit- X

 Namibia National Cricket Team vs United Arab Emirates National Cricket Team T20 Head To Head: नामिबिया विरुद्ध यूएई यांच्यातील टी 20 तिरंगी मालिका 2024 चा चौथा सामना आज म्हणजेच 02 ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना विंडहोक येथील वांडरर्स क्रिकेट मैदानावर होणार आहे. यूएईने तिरंगी मालिकेत आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. ज्यामध्ये एक सामना जिंकला आणि एक सामना नामिबियाविरुद्ध पराभूत झाला. दुसरीकडे, नामिबिया तिरंगी मालिकेत आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. नामिबियाने दोन्ही सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात यूएईचा 15 धावांनी पराभव झाला होता. तर दुसऱ्या सामन्यात नामिबियाचा 13 धावांनी पराभव झाला होता. नामिबिया संघ सलग तिसऱ्या दिवशी तिसरा सामना खेळणार आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (हेही वाचा: ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह जगात भारी; आयसीसी क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान; यशस्वी जैस्वाल विराट कोहली यांच्याही क्रमवारीत सुधारणा)

दोन्ही संघांमध्ये हेड टू हेड रेकॉर्ड

यूएई आणि नामिबिया स्टेट्स टी-20 मध्ये 3 सामन्यात आमनेसामने आले आहेत. ज्यामध्ये संयुक्त अरब अमिरातीने एक सामना जिंकला आहे. तर नामिबियाने एक सामना जिंकला आहे.अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो. नामिबिया संघ यूएईविरुद्ध पहिला विजय नोंदवण्यासाठी पूर्ण ताकदीने लढेल.

दोन्ही संघांचे खेळाडू

यूएई संघ : अलिशान शराफू, मुहम्मद वसीम (कर्णधार), विष्णू सुकुमारन, आसिफ खान, सय्यद हैदर शाह (विकेटकीपर), बासिल हमीद, अली नसीर, अयान अफजल खान, मुहम्मद फारूख, जुनैद सिद्दीकी, मुहम्मद जवादुल्ला, राहुल चोप्रा, ओमिद रहमान, आर्यांश शर्मा, राहुल भाटिया

नामिबिया संघ: सैतेजा मुक्कामल्ला, अँड्रिज गॉस (विकेटकीपर), स्मित पटेल, नितीश कुमार, मिलिंद कुमार, शायन जहांगीर, हरमीत सिंग, जसदीप सिंग (कर्णधार), नोस्तुश केन्झिगे, अभिषेक पराडकर, जुआनोय ड्रायस्डेल, मोनांक पटेल, यासिर मोहम्मद, उत्कर्ष श्रीवास्तव, अयान देसाई