ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह जगात भारी; आयसीसी क्रमवारीत पटकावले अव्वल स्थान; यशस्वी जैस्वाल विराट कोहली यांच्याही क्रमवारीत सुधारणा
भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्यानंतर भारतीय खेळाडूंच्या क्रमवारीत चांगली वाढ झाली आहे. जसप्रीत बुमराहने आर अश्विनला मागे टाकत गोलंदाजांच्या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
ICC Test Rankings: भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह बुधवारी जगातील अव्वल वेगवान गोलंदाज ठरला आहे. त्याने रविचंद्रन अश्विनला मागे टाकले. जसप्रीत बुमराहने(Jasprit Bumrah)बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील चमकदारी कामगिरी केली. त्याच्या जोरावर आयसीसीच्या (ICC)ताज्या कसोटी क्रमवारीत त्याने अव्वल स्थान पटकावले आहे. त्याशिवाय युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांनीही कसोटी क्रमवारीत प्रगती केली आहे. (हेही वाचा: Tim Southee Quits As New Zealand Test Captain: टीम साऊदीनं सोडलं न्यूझीलंडच कर्णधारपद; आता भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचं नेतृत्व कोण करणार?)
बादशाह बुमराह
भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळल्या गेलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बुमराहने 11 बळी घेतले होते. याचा फायदा आता त्याच्या आयसीसी क्रमवारी दिसून येत आहे. एक स्थान वर जात त्याने 870 गुणांसह पहिला क्रमांक गाठला. त्यामुळे, अश्विनची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली. अश्विन 869 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
अश्विनला मागे टाकत आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले
A new No.1 ranked bowler is crowned as India's Test stars rise the latest rankings 😯https://t.co/6xcPtYGiFW
— ICC (@ICC) October 2, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

