Tim Southee Quits As New Zealand Test Captain: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन सामन्यांची कसोटी मालिका 16 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. मात्र त्याआधी न्यूझीलंड संघाकडून (New Zealand National Cricket Team) एक मोठी बातमी समोर आली आहे. न्यूझीलंड क्रीकेटमध्ये मोठा भूकंप आला आहे. न्यूझीलंड संघाचा कर्णधार टीम साऊदीने (Tim Southee) कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघाचं नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. (हेही वाचा:Babar Azam Resigned: पाकिस्तानचा स्टार क्रिकेटर बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा; सोशल मीडियावर केली मोठी घोषणा)
एकीकडे भारतविरुद्ध महत्त्वाची कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊदीने न्यूझीलंडच्या कसोटी कर्णधारपदाचा राजीनामा दिला असून, विकेटकीपर-फलंदाज टॉम लॅथम यांच्यावर भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेदरम्यान संघाच नेतृत्व करणार आहे.
साऊथीचा कर्णधार कार्यकाळ
2021 च्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन एक डाव आणि मोठ्या 154 धावांनी पराभूत झालेल्या सामन्यात किवींचा गले येथे श्रीलंकेविरुद्ध 2-0 असा पराभव झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. केन विल्यमसनने 2022मध्ये कर्णधार पदाचा राजीनामा दिल्यानंतर साउथीकडे न्यूझीलंड संघाच कर्णधार पदाची धुरा आली. टीम साऊदीच्या नेतृत्वात 14 पैकी सहा कसोटी सामने खेळले गेले. त्यात सहा विजयी आणि दोन अनिर्णित राहिले.
टीम साऊदीनं सोडलं न्यूझीलंडच कर्णधारपद
JUST IN: Tim Southee has stepped down as New Zealand's Test captain.
Tom Latham will take charge of the team, starting with the upcoming tour of India 🇳🇿 pic.twitter.com/U5hwf9DMDE
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) October 1, 2024
संघाच्या हितासाठी घेतलेला निर्णय
"पद सोडण्याचा निर्णय संघाच्या हिताचा आहे आणि नवा कर्णधार म्हणून तो लॅथमला पाठिंबा देईल असे टीम साऊदी म्हणाले. ब्लॅक कॅप्सचे कर्णधारपद संभाळणे माझ्यासाठी सन्मानजणक आहे. मी माझ्या संपूर्ण कारकिर्दीत संघाला प्रथम स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला विश्वास आहे की हा निर्णय संघासाठी सर्वोत्तम आहे.”, असे म्हटले आहे.