Babar Azam (Photo Credit - Twiter)

Babar Azam Resigned: पाकिस्तानचा स्टार फलंदाज आणि कर्णधार बाबर आझमने(Babar Azam) त्याची कामगिरी सुधरवण्यासाठी मोठा निर्णय घेतला आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले आहे. बाबर आझमच्या निर्णयामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत बाबर आझमने हे जाहीर केलं आहे. याआधी देखील बाबर आझमने कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. 2019 मध्ये बाबर आझमने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. पाकिस्तानने (Pakistan Cricket Team) कोणतीही मोठी स्पर्धा जिंकलेली नाही. (हेही वाचा:T20 World Cup 2024 Schedule: 3 ऑक्टोबरपासून विश्वचषकाला होणार सुरुवात, या दिवशी भारत-पाकिस्तानचा महा मुकाबला होणार; जाणून घ्या टीम इंडियाचे संपूर्ण वेळापत्रक)

बाबर आझम ची पोस्ट?

कर्णधारपदावरून पायउतार होण्याच्या निर्णयाबाबत बोलताना बाबर आझमने सोशल मीडियावर म्हणाला की, मी कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. पण आता कर्णधारपदावरुन पायउतार होऊन माझ्या खेळाकडे लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. कर्णधारपदामुळे कामाचा ताण वाढला. मला माझ्या कामगिरीला प्राधान्य द्यायचे आहे, माझ्या फलंदाजीचा आनंद घ्यायचा आहे आणि माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. तुमच्या अतूट पाठिंबा आणि माझ्यावरील विश्वासाबद्दल मी कृतज्ञ आहे. तुमचा उत्साह माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्ही एकत्रितपणे जे काही साध्य केले आहे त्याचा मला अभिमान आहे आणि एक खेळाडू म्हणून, ज्या संघाचे योगदान सुरू ठेवण्यासाठी मी उत्सुक आहे. तुमच्या प्रेमासाठी आणि समर्थनासाठी धन्यवाद, असं बाबर आझमने म्हटलं आहे.

सोशल मीडिया पोस्ट

बाबर आझम नंतर शाहीनला कर्णधार बनवण्यात आले

शाहीन शाह आफ्रिदीची टी20I कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली. परंतु केवळ एका मालिकेनंतर त्याला वगळण्यात आले. ज्यामध्ये पाकिस्तानचा न्यूझीलंडकडून 4-1 असा पराभव झाला. त्यानंतर बाबरला कर्णधार पद देण्यात आले.