Earthquake in U19 World Cup | (Photo Credit - Twitter )

खेळ अथवा मैदान कोणतेही असो. अविस्मरणीय अनुभवांची मेजवानी ठरलेली. खेळ आणि मैदान जितके लोकप्रिय तितक्या ऐतिहासीक घटना अधिक. अंडर 19 वर्ल्ड कप सामन्यातही असेच काहीसे पाहायला मिळाले. हा सामना सुरु होता झिम्बाब्वे आणि आयर्लंड यांच्यात. या दोन्ही देशांच्या संघामध्ये प्लेट सेमीफाइनल-2 सामना सुरु होता. मैदानावर अचानक भूकंप (Earthquake in U19 World Cup) आला. मैदानावर सामना सुरु असताना अचानकच भूकंप (Earthquake in U19 World Cup) आल्याने मैदानच हलू लागले. हा भूकंप साधारण 20 मिनीटे राहिला. खेळाडू काही काळ गोंधळले पण त्याचा खेळावर फारसा परिणाम झाला नाही.

सोशल मीडियावर या घटनेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक गोलंदाज भूकंप आला असताना मैदानावर गोलंदाजी करताना दिसतो आहे. सोबतच खेळाचे हे थेट प्रक्षेपण दुरचित्रवाणी संचावरुन सुरु आहे. क्रिकेटचे चाहते मैदानावरचे हे दृश्य आपाहात आहेत. समालोचकही या सामन्याचे समालोचन करत आहे. हे सर्व असताना अचानक भूकंपाचा धक्का जाणवायला लागतो. अर्थात भूकंपाचा धक्का फार मोठा नसल्याने सर्व काही सामान्य असल्याचे जाणवते. (हेही वाचा, Coronavirus: शरद पवार यांचा हा Video पाहिलात का? किल्लारी भूकंप 1993 घटनेवेळी केलेले अपत्ती व्यवस्थापन कौशल्य पाहून तुम्हालाही मिळेल प्रेरणा)

ट्विट

दरम्यान, सामन्याबाबत बोलायचे तर हा सामना आयर्लंडच्या संघाने 8 गडी राखून जिंकला. तर झिम्बब्वे संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करत 48.4 षटकांमध्ये 166 धावा बनवल्या. शेवटी आयर्लंडने 2 गडी बाद 32 धावांनी हा सामना जिंकला.