यशस्वी जयस्वाल, रवि बिश्नोई यांनी U19 विश्वचषकमध्ये केला प्रभावी खेळ; टूर्नामेंटमध्ये केल्या सर्वाधिक धावा, घेतल्या सर्वात जास्त विकेट्स
यशस्वी जयस्वाल, रवि बिश्नोई (Photo Credits: Getty/Twitter)

भारताचा युवा सलामी फलंदाज यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) याच्यासाठी अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) 2020 हे स्वप्न सत्यात उतरल्या सारखे होते. या स्पर्धेच्या माध्यमातून कठोर परिश्रम आणि प्रतिभेच्या भारतीय संघात (Indian Team) स्थान कसे मिळवायचे हे दाखवून दिले. अगदी लहान वयातच अनेक संकटांचा सामना करत त्याने हार मानली नाही आणि सर्व कमतरता आणि अडचणी असूनही त्याने आपला क्रिकेटचा प्रवास सुरू ठेवला. त्याच्या अथक परिश्रमाचा परिणाम बांग्लादेशविरुद्ध अंडर-19 विश्वचषक फायनलमध्येही दिसून आला जिथे त्याने अर्धशतक शतक झळकावले. यशस्वी त्याच्या शानदार खेळामुळे या विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला, पण अंडर-19 विश्वचषकच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजमध्ये शिखर धवनला (Shikhar Dhawan) मागे टाकू शकला नाही. अंतिम सामन्यात 12 धावांनी त्याचे शतक हुकले. (U19 World Cup 2020 Final: बांग्लादेशविरुद्ध ध्रुव जुरेल अनोख्या पद्धतीने झाला आऊट, आठवड्यात दुसऱ्यांदा घटली अशी चक्रावणारी घटना)

अंडर-19 विश्वचषकमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे. धवनने 2004 च्या स्पर्धेत सर्वाधिक 505 धावा केल्या होत्या. यशस्वी धवनच्या बऱ्याच मागे राहिला. यशस्वी या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. या प्रकरणात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने एका मोसमात 372 धावा केल्या. म्हणजेच धवनचा विक्रम अबाधित आहे आणि अंडर-19 विश्वचषकच्या मोसमात तो अजूनही भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. दुसरीकडे, गोलंदाजीतही भारताने वर्चस्व गाजवले. फिरकी गोलंदाज रवि बिश्नोई (Ravi Bishnoi) याने यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक 17 विकेट्स घेतल्या. या स्पर्धेत कोणत्याही गोलंदाजाने घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत. शिवाय, कोणत्याही भारतीय गोलंदाजाने एकाच आवृत्तीत 14 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या नाहीत.

आजच्या अंडर-19 विश्वचषक फायनलमध्ये भारताने टॉस गमावून पहिले फलंदाजी केली. यशस्वीशिवाय अन्य भारतीय फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. यशस्वीने या मोसमात खेळलेल्या सहा सामन्यांत एक शतक आणि चार अर्धशतकांसह एकूण 133.33 च्या सरासरीने एकूण 400 धावा केल्या.