शोएब अख्तरने सुनील गावस्कर यांच्या बर्फवृष्टीच्या विधानावर केली कमेंट, Netizens म्हणाले 'यांना गोळीबाराची गरज आहे'
शोएब अख्तर (Photo Credit: Getty)

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoaib Akhtar) मागील काही दिवसांपासून भारत (India)-पाकिस्तान (Pakistan) वनडे मालिका आयोजित व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे. पाकिस्तानचे माजी कर्णधार रमीज राजाने त्याच्या युट्यूब वाहिनीवरील कार्यक्रमात सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांना दोन्ही देशांमधील क्रिकेट मालिकेबद्दल विचारले असता गावस्कर यांनी म्हटले की, "लाहोरमध्ये बर्फवृष्टी होऊ शकते, परंतु सद्य परिस्थितीत भारत-पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिका कठीण आहे." यावर अख्तरने फोटोद्वारे सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिली आहे. त्याने लाहोरमध्ये हिमवृष्टीचा एक फोटो ट्विट केला. भारत-पाकिस्तानमध्ये कोरोना व्हायरसने (Coronavirus) प्रभावित झालेल्या गरजूंसाठी निधी गोळा करण्यासाठी भारत-पाक सामना आयोजित करण्याच्या बाजूने उभे असलेले पाकिस्तानच्या माजी गोलंदाज शोएबने सोशल मीडियावर टीम इंडियाचे माजी कर्णधार गावस्कर यांना प्रत्युत्तर दिले आहे. यावर नेटकरी अख्तरला ट्रोल करत आहे. (भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेच्या प्रस्तावासाठी शाहिद आफ्रिदीने शोएब अख्तरचे केले समर्थन, मोदी सरकारवर साधला निशाणा)

अख्तरने फोटो शेअर केला आणि म्हणाला, "बरं सनी भाई, गेल्या वर्षी लाहोरमध्ये हिमवृष्टी झाली होती. म्हणून काहीही अशक्य नाही." शोएब अख्तरच्या या ट्विटवर भारतीय यूजर्सच नव्हे तर पाकिस्तानी देखील त्याला ट्रोल करत आहे. शोएबचे ट्विट नक्कीच पाकिस्तानमधील चाहत्यांना पसंत पडले नाही आणि त्यांनी अख्तरला इतके हताश होण्यासाठी फटकारले.

अख्तर यांचे ट्विटः

प्रतिक्रिया

मालिकेसाठी भीक मागण्याची गरज नाही

त्यांना गोळीबार करण्याची गरज आहे

गावस्कर जे बोलले ते अख्तरला समजले नाही

आम्हाला खेळायचे नाही

भिकारी

आपण भीक मागणे थांबवू शकता?

शोएबने यापूर्वी अनेकदा भारत-पाकिस्तान मालिका आयोजित करण्यावर जोर दिला होता. यातून मिळालेला पैसे दोन्ही देशात कोरोना व्हायरसविरुद्ध लढा बरोबरीत वाटला जावा असे अख्तरने मत व्यक्त केले होते. मात्र, आयपीएलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ल, वर्ल्ड कप विजेता कर्णधार कपिल देव आणि आता गावस्कर यांनी सध्याची स्थिती पाहता मालिका आयोजित करण्यास सक्तीने मनाई केले आहे.