PSL टीम इस्लामाबाद यूनाइटेडने उडवली जसप्रीत बुमराहची खिल्ली, संतापलेल्या Netizens ने दिलं जोरादार प्रत्युत्तर
जसप्रीत बुमराह (Photo Credit: Getty Images)

पाकिस्तान सुपर लीग (पीएलएल) फ्रँचायझी टीम इस्लामाबाद यूनाइटेडने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहविषयी एक ट्विट केले असून यामुळे भारतीय चाहत्यांना भडकले आहेत. पाकिस्तान सुपर लीगच्या संघाने 2017 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात बुमराहने टाकलेल्या नो-बॉल टाकण्याचा फोटो शेअर केल्याने त्यांना सोशल मीडिया यूजर्सच्या रोषाचा सामना करावा लागला. प्राणघातक कोरोना व्हायरसमुळे क्रीडा क्षेत्र ठप्प पडले आणि आणि बाधित देशांना आपल्या नागरिकांना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाउन करावे लागले आहे. घरामध्ये राहणं आणि सामाजिक अंतर राखण्याचे महत्त्व सांगून खेळाडू, संघ आणि सेलिब्रिटींनी मृत्यूशी संबंधित आजाराबद्दल जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला. कोविड-19च्या पार्श्वभूमीवर पीएसएलचा दिग्गज संघ इस्लामाबाद युनायटेडने पाकिस्तानच्या नागरिकांना घरातून विनाकारण विनाकारण बाहेर पडू नये अशी विनंती केली. (रोहित शर्माची मुलगी समायराने आपल्या गोलंदाजीची नक्कल केलेली पाहून जसप्रीत बुमराह बनला तिचा फॅन)

“ओळ ओलांडू नका. हे महाग ठरू शकते! आपली घरे विनाकारण सोडू नका, आपापसातील अंतर कायम ठेवा, परंतु तुमची अंतःकरणं जवळ राहतील याची खात्री करा,” असे पीएसएलने गुरुवारी ट्विट केले. यासह त्यांनी बुमराहचा चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील नो-बॉलचा फोटोही शेअर केला. ट्विटर यूजर्सने इस्लामाबाद युनायटेड सोशल मीडियाला धडा शिकवण्यासाठी त्यांना ट्रोल केलं.

“आत रहा, सुरक्षित रहा किंवा 5 वर्षाच्या तुरूंगवासाला सामोरे जा,” असे एका यूजरने वेगवान गोलंदाज मोहम्मद अमीरचा फोटो शेअर करून पोस्ट केला.

आपला चेहरा मास्कने झाकलेला असल्याची खात्री करा

हाहाहा!

दूर रहा, सुरक्षित रहा

या सामन्यात पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर याने स्पॉट फिक्सिंग करत मुद्दाम नो-बॉल टाकळायचे सिद्ध झाले आणि त्याला पाच वर्षांची तुरुंगवास भोगावा लागला. दुसरीकडे, बुमराहने अद्याप ट्विटवर भाष्य केले नाही. यापूर्वी, जयपूर पोलिसांनी वाहतुकीचे नियम न मोडण्यास दिलेल्या चेतावणीवर प्रतिक्रिया दिली होती.