न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटर जिमी नीशम (Jimmy Neesham) ट्विटरवर आपल्या विनोदी टिप्पणीने चर्चेत राहण्यासाठी ओळखला जातो. नीशम आपल्या चाहत्यांसमवेत विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर संवाद साधतो. प्रश्न विचारल्यानंतर किवी खेळाडू प्रतिसाद देण्यासाठी मागेपुढे पाहत नाही. अलीकडेच, निशमने यूजर्सशी असेच एक संभाषण केले. एका यूजरने जिमीला न्यूझीलंड (New Zealand) डॉलर्समध्ये त्याच्या एकूण संपत्तीबद्दल विचारले. यावर जिमीने दिलेले उत्तर तुमचेही मन जिंकले हे नक्की. निशामच्या या उत्तराशी अगदी कोणीही सहमत होईल. शिवाय, एका यूजरने जिमीला या लॉकडाउन काळात घरी बसून 'बिग बँग थियरी' पाहायाला सांगितले. यावर तो भडकला आणि हा शो पाहण्यासाठी कोणीही त्याला सल्ला देऊ नये असे म्हटले आणि जो कोणी यूजर असं करेल त्यांना तो सोशल मीडियावर ब्लॉक करेल असे स्पष्टही केले. बिग बँग थिअरी हा सर्वात लोकप्रिय आणि दीर्घकाळ चालणारा टीव्ही कार्यक्रमांपैकी एक आहे. शोबद्दल इतका द्वेष का आहे असे एका यूजरने विचारल्यास जिमीने म्हटले की ते इतके वाईट आहे की यामुळे त्याला शारीरिक वेदना दिल्या. (कोरी अँडरसनने विराट कोहली, रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाची केली तुलना, म्हणाला दोघांच्या 'या' क्वालिटीमुळे टीम इंडियाला मिळतंय यश)
दरम्यान, यूजरने त्याला विचारलेल्या एकूण संपत्तीबाबत जिमी म्हणाला की खरी नेट वर्थ मित्र आहे. जिमीने यूजरला प्रतिसाद देत लिहिले, "वाटेत जे मित्र बनतात तेच खरी नेटवर्थ होय."
The real net worth is the friends we make along the way https://t.co/zZZqob45NX
— Jimmy Neesham (@JimmyNeesh) April 21, 2020
दरम्यान, जिमीने न्यूझीलंडकडून अखेरचा वनडे सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध मार्चमध्ये खेळला. सिडनी क्रिकेट ग्राउंडमध्ये खेळण्यात आलेला मालिकेतील पहिला सामना कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत प्रेक्षकांविना रिक्त स्टेडियममध्ये खेळवण्यात आला होता. त्यानंतर मालिका स्थगित करण्यात आली आणि किवी क्रिकेटर्सना त्यांच्या घरी परत जाण्यास सांगण्यात आले. रिकाम्या स्टँड्ससमोर खेळण्याचा विचित्र अनुभव नीशमला होता. सुरक्षा कर्मचार्यांचा वॉकी टॉकीजवर संवाद ऐकू येत असल्याची एक घटना जिमीने सांगितली. सामन्यानंतर गोष्टी कशा बिघडून गेल्या आहेत हे पाहून तो चकित झाला.