Tri-Series in Bangladesh 2019: बांग्लादेशविरुद्ध अफगाणिस्तान संघाचा विक्रमी विजयी, टी-20 मध्ये मोडला आपलाच रेकॉर्ड
अफगाणिस्तान संघ (Photo Credit: Getty)

रशीद खान (Rahid Khan) याच्या नेतृत्वात अफगाणिस्तान (Afghanistan) संघाने बांगलादेशात खेळल्या जाणार्‍या टी-20 तिरंगी मालिकेतही चांगली कामगिरी सुरू ठेवली आहे. येथील शेर-ए बांगला राष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या टी-20 तिरंगी मालिकेच्या सामन्यात अफगाणिस्तानने बांग्लादेशला (Bangladesh) 25 धावांनी पराभूत केले. तिरंगी मालिकेतील तिसरा संघ झिम्बाब्वेचा आहे. अफगाणिस्तानसाठी संघाचा अष्टपैलू मोहम्मद नबी (Mohammed Nabi) आणि गोलंदाज मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) यांनी उत्कृष्ट कामगिरी करून संघाला विजय मिळवून दिला. या मालिकेत अफगाण संघाचा हा सलग दुसरा विजय होता आणि या विजयानंतर आता अफघाण संघ 8 गुणांसह पहिल्या स्थानावर पोहचला आहे. यासह अफगाणिस्तान संघाने आपलाच रेकॉर्ड मोडत टी-20 मध्ये नवीन रेकॉर्डची नोंद केली. (Ashes 2019: स्टिव्ह स्मिथ याने सुनील गावस्कर यांच्या 49 वर्ष जुन्या रेकॉर्डची केली बरोबरी, वाचा सविस्तर)

आजवर खेळलेल्या मॅचमध्ये अफगाणिस्तानने कोणत्याही सामना गमावल्याशिवाय टी-20 मध्ये हा सलग 12 वा विजय मिळवला आहे. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाने 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 164 धावा केल्या. मो नबीने 54 चेंडूत 3 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने नाबाद 84 धावा केल्या, तर असगर अफगाणने 37 चेंडूत 40 धवनची खेळी केली. संघातील अन्य फलंदाज काही खास कामगिरी करू शकले नाहीत. त्याचबरोबर पहिल्या डावात बांगलादेशकडून मोहम्मद सैफुद्दीन याने चार तर शाकिब अल हसन याने दोन गडी बाद केले.

अफगाणिस्तानने बांगलादेशला विजयासाठी 165 धावांचे लक्ष्य होते, परंतु संपूर्ण संघ 19.5 ओव्हरमध्ये 139 धावांवर बाद झाला आणि 25 धावांनी सामना गमावला. बांगलादेशकडून महमुदुल्लाने सर्वात मोठी खेळी केली. त्याने 39 चेंडूत 44 धावा केल्या तर, शब्बीर रहमान याने 27 चेंडूत 24 धावा केल्या. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी अतिशय चांगली गोलंदाजी केली आणि मजीब उर रहमान याला चार, तर फरीद मलिक, राशिद खान आणि गुलबदीन नैब यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.